27.8 C
Latur
Friday, July 1, 2022
Homeश्रीनगरमध्ये भारतीय सैनिक-दहशतवाद्यांमध्ये चकमक

श्रीनगरमध्ये भारतीय सैनिक-दहशतवाद्यांमध्ये चकमक

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
श्रीनगरमधील नवाकदल परिसरात काल (सोमवारी) रात्री भारतीय सैन्य दलात आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत किती दहशतवाद्यांना कंठस्रान घालण्यात सैनिकांना यश आलं, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. परिसरात भारतीय सैन्यदलाच्यावतीने सर्च आॅपरेशन सुरु करण्यात आले आहे. त्यानंतर श्रीनगरमधील मोबाईल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

Read More  वाशिममध्ये ‘कोरोना’चा पुन्हा शिरकाव

काही दिवसांपूर्वी झाली होती चकमक
दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील डोडा जिल्ह्यातील एका गावात दहशतवादी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये चकमक झाली होती. यामध्ये भारतीय सैन्य दलाचा एक जवान शहीद झाला होता. सैन्य दलाच्या अधिकाºयांनी दिलेल्या माहितीनुसार, जवानांना डोडा जिल्ह्यातील एका गावात दहशतवादी असल्याची माहिती मिळताच, त्यांनी डोडा शहरापासून २६ किलोमीटर अंतरावर गुंडाना परिसरात असलेल्या पोस्ता-पोत्रा गावात एक सर्च आॅपरेशन चालवले.

Read More  ‘बेस्ट’ला पालिकेची पंधराशे कोटींची मदत-यशवंत जाधव

त्यांनी सांगितले होते की, लपलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार करण्यास सुरुवात केली होती. ज्यामध्ये सैन्यदलातील एक जवान गंभीर जखमी झाला असून, हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याआधीच तो शहीद झाला होता. पुढे बोलताना अधिकारी म्हणाले की, सेना राष्ट्रीय रायफल्स, पोलिस आणि सीआरपीएफच्या संयुक्त दलाने एका घरात संशयित दहशतवादी असल्याची माहिती मिळताच हे सर्च आॅपरेशन चालवले होते.

हिजबुल दहशतवाद्याला अटक

जम्मू-काश्मीरमधील डोडा जिल्ह्यात सक्रीय असलेल्या हिजबुलच्या दहशतवाद्याला भारतीय सुरक्षा रक्षकांनी अटक केली आहे. या दहशतवाद्याकडे एक बंदूक सापडली होती. टटना शेखापुरा भागात एक दशहतवादी लपलेल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सर्च आॅपरेशन करण्यात आले होते.भारतीय सुरक्षा रक्षक, निमलष्करी दल आणि जम्मू आणि पोलिस यांच्यामार्फत हे सर्च आॅपरेशन चालवले. दहशतवाद्याला चारही बाजूने घेरण्यात आले. यावेळी दहशतवाद्याने पळ काढताना त्याला अटक करण्यात आली होती.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या