23.2 C
Latur
Sunday, June 26, 2022
Homeक्राइमबीडमध्ये क्लासेस चालकाची आत्महत्या

बीडमध्ये क्लासेस चालकाची आत्महत्या

एकमत ऑनलाईन

बीड : बीड शहरात नामांकित क्लासेस चालकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या आत्महत्येचे वृत्त समजताच परिसरात खळबळ माजली आहे. माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वीच त्याने क्लासेसचे उद्घाटन केले होते. ही घटना नैराश्यातून घडली की आणखी काही कारण आहे? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

बीड शहरातील नाथसृष्टी भागात राहणारे राजाराम धस (वय ४०) असे आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे नाव असून ते गेल्या वीस वर्षांपासून खासगी क्लासेस चालवत होते. मूळचे केज तालुक्यातील सारणी गावचे राजाराम धस वडील पोलिसांत असल्यामुळे बीड शहरात वास्तव्याला आले. काही वर्षे शहरातील जिज्ञासा करिअर अकॅडमीमध्ये शिक्षक म्हणून काम केल्यानंतर गेल्या आठ वर्षांपासून शहरातील अंकुश नगर भागात ते स्वत:च ब्राईट स्पर्धा परीक्षा केंद्र चालवत होते.
रात्री कुटुंबियांसोबत जेवण केले

रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास राजाराम धस यांनी आपल्या कुटुंबियांसोबत जेवण केले आणि त्यानंतर सर्वजण झोपण्यासाठी आपापल्या खोलीत गेले, मात्र तीन वाजता त्यांचा लहान भाऊ उठला असता एका बंद असलेल्या खोलीचा दरवाजा त्याला उघडा दिसला आणि त्याने आत जाऊन पाहिले असता राजाराम धस यांनी गळफास घेतलेल्याचे त्याच्या निदर्शनास आले, त्यांनी तात्काळ शिवाजीनगर पोलिसांना या घटनेची माहिती दिली.

पोलिस तात्काळ घटनास्थळावर दाखल झाले आणि राजाराम यांचा मृतदेह बीडच्या जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला. राजाराम धस यांनी आत्महत्या का केली याचे कारण मात्र अद्याप कळलेले नाही. याबाबत पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या