23.8 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeमराठवाडाआरोग्य विभागाचा क्लास वनचा अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

आरोग्य विभागाचा क्लास वनचा अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

एकमत ऑनलाईन

नाशिक : नाशिकच्या लाचलूपचपत प्रतिबंधक विभागाची धडक कारवाई सुरूच असून आताच्या कारवाईत वर्ग एकचा अधिकारी जाळ्यात अडकला आहे. सेवानिवृत्तीनंतरचे रजा रोखीकरणाचे बिल मंजूर करण्यासाठी वीस हजार रुपयांची लाच घेताना आरोग्य विभागाच्या उपसंचालक कार्यालयातील मुख्य प्रशासकीय अधिकारी यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे.

गेल्या काही दिवसांपासून नाशिकसह जिल्ह्यातील लाचेच्या प्रकरणांत वाढ झाली आहे. दर आठवड्यात लाचेचे उघडकीस येत आहेत. त्यातच नाशिकच्या आरोग्य विभागाच्या उपसंचालक कार्यालयातील मुख्य प्रशासकीय अधिका-यांलाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे.
गजानन मारोतराव लांजेवार असे लाज घेणा-या अधिका-याचे नाव आहे. लांजेराव हे नाशिकच्या उपसंचालक आरोग्यसेवा या ठिकाणी कार्यरत आहेत. त्यांनी तक्रारदार यांचे सेवानिवृत्तीनंतरचे रजा रोखीकरणाचे बिल मंजूर करण्यासाठी २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून त्यांना २० हजारांची लाच स्विकारतांना पकडण्यात आले.

गजानन लांजेवार यांनी सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी असलेले तक्रारदार यांच्याकडे सेवा निवृत्ती नंतरचे रजा रोखीकरणाचे बिल मंजूर करण्यासाठी वीस हजार रुपयांचे लाच मागितली होती.

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक सुनील कडासने यांच्या एका मार्गदर्शनाखाली झालेल्या कारवाईत बुधवारी संदर्भ रुग्णालयाच्या आवारातील उपसंचालक कार्यालयात हा सापळा लावण्यात आला होता.

एसीबीच्या पथकाने दिलेल्या माहितीनुसार आरोग्य विभागातून धुळे जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी पदावरून निवृत्त झालेल्या अधिका-याने उपसंचालक कार्यालयात त्याच्या कार्यकाळातील रजेच्या रोखीकरणाचे बिल मंजुरीसाठी पाठपुरावा सुरू केला होता. सर्व कागदपत्रे व प्रक्रिया पूर्ण करूनही मुख्य प्रशासकीय अधिकारी लांजेवार यांच्याकडून बिल मंजुरीसाठी टाळाटाळ केली जात होती.
याबाबत लांजेवार यांनी या कामाच्या मोबदल्यात २० हजार रुपयांची मागणी केली होती.

त्यानुसार तक्रारदार सेवानिवृत्त अधिका-याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून प्रकार कळवला. त्यानुसार बुधवारी पथकाने संदर्भ रुग्णालयात सापळा रचला असता नियोजनानुसार दुपारी लांजेवार यांच्या दालनातच त्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. याबाबत त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या