25 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeमहाराष्ट्रआर्यन खानसह ६ जणांना क्लिनचीट

आर्यन खानसह ६ जणांना क्लिनचीट

एकमत ऑनलाईन

मुंबई : आर्यन खानला अटक करण्यात आलेल्या कॉर्डिलिया क्रझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी एनसीबीने १४ आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल केले. मात्र सबळ पुराव्याअभावी आर्यन खानसह सहा जणांना या प्रकरणात क्लिनचीट मिळाली आहे. सबळ पुराव्यांअभावी सदर सहा जणांविरोधात कोणतेही आरोप नाहीत. केवळ १४ जणांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. एनसीबीचे डीडीजी संजय सिंह यांनी याबाबत माहिती दिली आहे.

याप्रकरणी तपास करत असलेल्या एसआयटीला कोर्टाने मार्च अखेरीस दिलेली ६० दिवसांची मुदतवाढ दिली होती. याप्रकरणी आर्यनसह २० जणांना अटक झाली होती. आता या प्रकरणात आर्यनला दिलासा मिळाला आहे. कारण त्याच्या विरोधात आरोपपत्र दाखल झालेले नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकूण १० खंडाचे आरोपपत्र न्यायालयाच्या रजिस्ट्रीमध्ये सबमिट करण्यात आलेले आहे. ६००० पानांचे आरोपपत्र असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या