22.7 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeमहाराष्ट्रअडीच वर्षाच्या चिमुकलीकडून भीमाशंकर गडाची चढाई ; इंडिया बुक्स ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

अडीच वर्षाच्या चिमुकलीकडून भीमाशंकर गडाची चढाई ; इंडिया बुक्स ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

एकमत ऑनलाईन

पुणे : : महाराष्ट्रातील भीमाशंकर गडाचे नाव घेता भल्या-भल्या ट्रेकर्सना घाम फुटतो. परंतु, डहाणूतील वडकून येथल्या केशवी राम माच्छी या दोन वर्षे दहा महिन्यांच्या चिमुकलीने केवळ ११ तासांत १७ कि. मी. गडाची चढाई पूर्ण केली.

डहाणूतील गडप्रेमी ट्रेकर्स ग्रुपने ३१ जुलै रोजी भीमाशंकर या ज्योतिर्लिंगाच्या गडावर ट्रेकिंगचे आयोजन केले होते. याकरिता ३० जुलैच्या रात्री दहाच्या सुमारास खाजगी वाहनाने प्रवास सुरू केला. या ग्रुपसोबत वडकून खेतीपाडा येथील आनंद माच्छी, पत्नी आणि बहीण हे निघाले. मात्र, आपण सोबत येणार, असा हट्ट अवघ्या दोन वर्षांच्या केशवीने धरला होता.

केशवी काही ऐकेना म्हणून आनंद माच्छी यांनी तिलाही सोबत घेतले. तिच्या वयाचा विचार करता ती भीमाशंकर गडाची चढाई करेल का? असा प्रश्न गडप्रेमी ग्रुप आणि तिच्या कुटुंबीयांच्या मनात होताच. तिच्या चढाईबाबत सर्वांना शंका होती. सकाळी साडेदहा वाजता केशवीने खांडस गावातून भीमाशंकरच्या चढाईला सुरुवात केली. गडप्रेमी ट्रेकर्स ग्रुपसोबत केशवीही चालत निघाली. या गडावर चढाईसाठी पाय-या नसल्याने काका, काकूचा तर कधी आत्या आणि बहिणीचा हात धरून ती चालू लागली.

या प्रवासात केशवीला तिच्या कुटुंबीयांनी उचलून घेण्याचा प्रयत्न केला. भीमाशंकर गडावरील, हिरवी झाडे, छोटे धबधबे, पक्षी, माकड, पाहून जणू भुरळ पडल्याप्रमाणे ती शिखराकडे मार्गक्रमण करत होती. छोट्या चिमुरडीचा मोठा पराक्रम, धाडस आणि उत्साह पाहून सर्वांकडून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरू होता.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या