19.6 C
Latur
Tuesday, February 7, 2023
Homeराष्ट्रीयसीएनजी महागले

सीएनजी महागले

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात चढ-उतार सुरू आहेत. इंधन दरवाढीमुळे सामान्यांचे बजेट आणखी बिघडण्याची शक्यता आहे. कच्च्या तेलाच्या दरात होत असलेल्या घसरणीचा फायदा अजूनही ग्राहकांना मिळाला नाही. दिल्लीत सीएनजीच्या दरात वाढ झाली आहे. तर, दुसरीकडे इंधन कंपन्यांनी पेट्रोल डिझेलच्या दरात कोणताही बदल केला नाही.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात घसरण सुरू आहे. ब्रेंट क्रूड ऑइलचा दर ७९.०४ डॉलर प्रति बॅरल इतका आहे. तर, हळक क्रूड ऑइलचा दर ७४.२९ डॉलर प्रति बॅरल इतका आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात मागील काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या दरात घसरण होत आहे.

दिल्लीत आजपासून सीएनजीच्या दरात वाढ झाली आहे. दिल्लीत सीएनजीचा दर प्रति किलो ९५ पैसे इतका वाढला आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये ७८.६१ रुपये प्रतिकिलो इतका सीएनजीचा दर झाला आहे. दिल्ली-एनसीआरमधील सीएनजी दरात वाढ झाल्यानंतर मुंबई, महाराष्ट्रातही सीएनजी दरवाढ होईल का, याकडे वाहनचालकांचे लक्ष लागले आहे.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या