29.2 C
Latur
Friday, May 7, 2021
Homeराष्ट्रीयसीएनजी, पीएनजी दरातही वाढ

सीएनजी, पीएनजी दरातही वाढ

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : इंधन दरवाढीमुळे सामान्य नागरिकांना मोठा धक्का बसला आहे. पंरतु, आता पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी गॅस पाठोपाठ सीएनजी तसेच पीएनजीचे दर वधारले आहेत. राजधानी दिल्लीत सीएनजी गॅस दरात ७० पैशांनी तर पीएनजी (पाईप नॅचरल गॅस) ९१ पैशांनी वाढ करण्यात आली आहे. मंगळवारी सकाळी ६ वाजतापासून नवीन दर लागू करण्यात आले आहेत. या इंधनदरवाढीमुळे जनतेला विशेषत: दिल्लीकरांच्या खिशावर चांगलेच ओझे पडणार असल्याचे बोलले जात आहे. दरवाढीनंतर दिल्लीत सीएनजीची ४३ रूपये ४० पैसे रूपये किलोग्रॅम प्रमाणे विक्री केली जात असल्याची माहिती इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड कडून देण्यात आली आहे.

दरम्यान पेट्रोल, डिझेलच्या दराची हळू हळू शंभरीकडे वाटचाल सुरू आहे. काही दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मंगळवारी पुन्हा पेट्रोल, डिझेल दरात वाढ झाली. मुंबईत पेट्रोलचे दर ९७.५७ रुपयांवर पोहोचले आहे, तर डिझेलचे दर ८८.६० रुपये झाले आहे. नवी दिल्लीत पेट्रोल ९१.१७ रुपये तर डिझेल ८१.४७ रुपये लीटर एवढे झाले आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात २५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांना १४.२ किलो वजनाच्या विना अनुदानित सिलिंडरसाठी ८१९ रुपये मोजावे लागणार आहे. २४ फेब्रुवारीला एलपीजी गॅसच्या दरात २५ रुपयांची वाढ करण्यात आली होती. एका महिन्यात चौथ्यांदा वाढ झाल्याने केवळ तीन आठवड्यातच सिलिंडरच्या किंमतीत एकूण १०० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे आधीच पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे हैराण झालेल्या सामान्य जनतेला या सिलिंंडरच्या किंमती वाढीमुळे धक्का बसला आहे.

शिक्षण संस्थांनी अतिरिक्त फी वाढ थांबवा; उच्च न्यायालयाचे आवाहन

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या