22.1 C
Latur
Friday, December 9, 2022
Homeराष्ट्रीयकोईम्बतूर स्फोटाचे धागेदोरे आयसीसशी; आरोपीची कबूली

कोईम्बतूर स्फोटाचे धागेदोरे आयसीसशी; आरोपीची कबूली

एकमत ऑनलाईन

चेन्नई : कोईम्बतूरमध्ये २३ ऑक्टोबरला झालेल्या कार स्फोटात आयसीस या दहशतवादी संघटनेचा हात होता, याचे धागेदोरे राष्ट्रीय तपास यंत्रणांच्या हाती लागले आहेत.

या स्फोटात ठार झालेला २९ वर्षीय अभियंता जेमिशा मुबीन हाच कारचा मालक होता. या प्रकरणात अटक झालेल्या आरोपीने स्फोटाचे कनेक्शन आयसीस या दहशतवादी संघटनेशी जुळत असल्याची कबुली दिली आहे. श्रीलंकेतील ईस्टन बॉम्बस्फोटातील आरोपींना भेटल्याचे त्याने कबूल केले आहे.

मुबीनची यापूर्वीही झाली होती चौकशी

केंद्रिय तपास यंत्रणेने यापूर्वी २०१८मध्ये मुबीनला दहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून ताब्यात घेत चौकशी केली होती. मुबीन हा श्रीलंकेतील इस्टर संडे बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड मोहम्मद अझरुद्दीनचा निकटवर्तीय होता, असा तपास यंत्रणेचा संशय होता. मात्र तपास यंत्रणेला तसे पुरावे हाती लागलेले नव्हते. त्यामुळे पुराव्याअभावी त्याला सोडण्यात आले होते. मुबीन दक्षिण भारतात ५ ठिकाणी स्फोट घडवणार होता.

मुबीनच्या अड्ड्यावरून आक्षेपार्ह साहित्य
ज्या ठिकाणी मुबीन लपून बसला होता, तिथे तामिळनाडू पोलिसांनी छावे टाकक १०९ प्रकारचे आक्षेपार्ह साहित्य जप्त केले होते. यात पोटॅशियम नायट्रेट, ब्लॅक पावडर, नकाशे, दोन मीटर लांब क्रॅकर फ्यूज, नायट्रो-ग्लिसरीन, रेड फॉस्फरस, पीईटीएन पावडर, अ‍ॅल्युमिनियम पावडर, वायर, लोखंडी खिळे, स्विच, इंडेन गॅस सिंिलडर, गॅस रेग्युलेटर, इन्सुलेशन टेप आदी गोष्टींचा समावेश होता. तपास यंत्रणेने मुबीनकडून एक डायरी देखील जप्त केली आहे.

मुबीनसह ५ जणांना १५ दिवसांची कोठडी
झडतीदरम्यान मुबीनच्या घरातून ७५ किलो पोटॅशियम नायट्रेट, चारकोल आणि अ‍ॅल्युमनियम पावडरही जप्त करण्यात आली. याशिवाय एक कागद सापडला, ज्यामध्ये कोईम्बतूर पोलीस आयुक्तालय, जिल्हाधिकारी कार्यालय, व्हिक्टोरिया हॉल, कोईम्बतूर रेल्वे स्टेशन आणि रेसकोर्सच्या ५ ठिकाणाचे पत्ते होते.

आतापर्यंत ६ जणांना अटक
कोईंबतूर बॉम्ब स्फोटात कारमध्ये दोन एलपीजी सिलिंडर होते. त्यापैकी एकाचा स्फोट झाला. दुसरा सिलिंडर फुटला असता तर मंदिर आणि आजूबाजूच्या अनेक घरांचे नुकसान झाले असते.
या प्रकरणी एनआयएने २७ ऑक्टोबर ला गुन्हा नोंदवला होता. त्यानंतर आतापर्यंत ६ संशयितांना अटक करण्यात आली आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या