आयसीसी अध्यक्षपदी कॉलिन ग्रेव्हज!

  424

  गांगुलीसंबंधी आयसीसी नेतृत्वाच्या चर्चेला ब्रेक; शशांक मनोहर यांचा कार्यकाळ पूर्ण

  दुबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुलीकडे आयसीसीच्या नेतृत्वाची धुरा सोपवल्या जाण्याच्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला. गांगुली आयसीसीच्या अध्यक्षपदी विराजमान होणार नाही, हे आता पूर्णपणे स्पष्ट झाले आहे.
  सध्याचे आयसीसी अध्यक्ष शशांक मनोहर यांचा कार्यकाळ याच महिन्यात पूर्ण होत आहे. त्यांनी कार्यकाळ वाढवून घेण्यास नकार दर्शवला. त्यामुळे अशात गांगुलीच्या आयसीसी अध्यक्षपदी नियुक्तीच्या आशा पूर्णपणे मावळल्या आहेत, अशी माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी दिली. शशांक मनोहर यांची २०१८ मध्ये दोन वर्षांसाठी पुन्हा बिनविरोध आयसीसीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली होती. त्यामुळे आता त्यांचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. अशात लॉकडाऊनचे संकट ओढवलेले आहे. त्यामुळे सर्वच इव्हेंट सध्या बंद आहेत. अशात मनोहर यांच्या कार्यकाळात वाढ व्हावी, अशी मागणी केली जात होती. मात्र, मनोहर यांनी यासाठी आपणच उत्सुक नसल्याची प्रतिक्रिया दिली. त्यामुळे आता गांगुलीच्या चर्चेवर पडदा पडला. तसेच इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट मंडळाचे चेअरमन कॉलिन ग्रेव्हज यांचा आयसीसी अध्यक्षपदी विराजमान होण्याचा मार्ग सुकर झाला. मात्र, यादरम्यान सर्वच क्रिकेटपटूंची गांगुलीच्या नावालाच पहिली पसंती होती. गांगुलीमध्ये कुशल नेतृत्वाचा गुण असल्याची प्रतिक्रियाही आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक यांनी दिली होती.

  Read More  हिंगोलीत आज पुन्हा तीन रुग्ण कोरोनाबाधित

  • आयसीसीच्या समोर हे पर्याय
   क्रिकेट आॅस्ट्रेलियाला २०२०सालचा वर्ल्ड कप पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये खेळवण्यास कोणतीही अडचण नाही. पण यामुळे टी-२० वर्ल्ड कपचा ओव्हरडोस होईल. तसेच एप्रिल महिन्यात आयपीएल स्पर्धा आहेच. यामुळे इंग्लंडचा भारत दौरा अडचणीत येईल. बीसीसीआयने जर क्रिकेट आॅस्ट्रेलियाला २०२१ साली टी-२० वर्ल्ड कप आयोजनाची परवानगी दिली आणि २०२२ साली पुन्हा भारतात टी-२० वर्ल्ड कपचे आयोजन होऊ शकले. पण यामुळे भारत आणि आॅस्ट्रेलियात होणारी कसोटी मालिका अडचणी येईल. तसेच सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बीसीसीआयकडे टी-२० वर्ल्ड कप पुढे ढकलण्याचे कोणते कारण नाही. आॅस्ट्रेलियाने २०२०च्या ऐवजी २०२२साली वर्ल्ड कप खेळवला तर सर्व खेळाडू आणि आयसीसी आणि अन्य संघांसाठी ते योग्य ठरले.