24.2 C
Latur
Thursday, March 4, 2021
Home वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी जिल्हाधिकारी रस्त्यावर

वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी जिल्हाधिकारी रस्त्यावर

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण लातूरने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून नागरिकांची एका परिसरात होणारी गर्दी टाळण्यासाठी गंज गोलाई परिसरात फिजिकल डिस्टन्स आवश्यक असल्याने दुचाकी, तीनचाकी, चारचाकी वाहनांची पार्किंग गंज गोलाई व परिसरात बंद करण्यात आली आहे़ त्याची अंमलबजावणी करण्यासाठी स्वत: जिल्हाधिकारी जी़ श्रीकांत दि़ १६ मे रोजी रस्त्यावर उतरले होते़ त्यांनी गंज गोलाईच्या परिसरात बेकायदेशीरपणे पार्किंग केलेल्या वाहनांवर कारवाई केली.

Read More  लातूर शहरात पुन्हा शुकशुकाट

जिल्हाधिकारी यांनी एका आदेशाद्वारे हनुमान चौक ते गंज गोलाई रोड, हनुमान चौक, सुभाष चौक ते हत्तेनगर कॉर्नर रोड, हत्ते कॉर्नर ते गंज गोलाई, सराफ लाईन, गूळ मार्केट रोड, हनुमान चौक ते गूळ मार्केट रोड, हनुमान चौक ते गंज गोलाई परिसरातील लहान-लहान जोडण्यात आलेल्या रस्त्यांवरील वाहनांची पार्किंग, तापडिया मार्केट ते कापड लाईन गंज गोलाई परिसरातील जोडण्यात आलेल्या रस्त्यांवरील पार्किंग, सुभाष चौक ते भुसार लाईन गंज गोलाई परिसरातील जोडलेल्या लहान रस्त्यांवरील पार्किंग, हत्ते कॉर्नर ते मस्जिद रोड, गंज गोलाई परिसरातील लहान जोडण्यात आलेल्य रस्त्यांवरील पार्किंग, गंज गोलाई ते जुना शिवाजी रोड परिसरातील वाहनांची पार्किंग, गंज गोलाई ते सराफ लाईन, गूळ मार्केट परिसरातील लहान जोडण्यात आलेल्या रस्त्यांवरील पार्किंगवर प्रतिबंध घालण्यात आला आहे.

खरेदीनिमित्त बाजारपेठेत आलेल्या वाहनधारकांनी आपली वाहने साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे पुतळ्याच्या परिसरातील मोकळी जागा, गांधी मार्केट परिसरातील महानगरपलिकेच्या पार्किंगची जागा, गंज गोलाईतील ईलमचंद दुकानाच्या पाठीमागील मोकळी जागा, घंटे किरणाच्या बाजूस, डालडा फॅक्ट्रीच्या मोकळ्या जागेत, मध्यवर्ती बस स्थानकात तात्पुरत्या स्वरुपात वाहनांची पार्किंग करण्याची सोय करण्यात आली आहे़

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या