22.7 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeऔरंगाबादआ. बंबविरोधात शिक्षक एकवटले

आ. बंबविरोधात शिक्षक एकवटले

एकमत ऑनलाईन

शिक्षक संघटना आक्रमक, औरंगाबादेत सन्मान रॅली
औरंगाबाद : भाजप आमदार प्रशांत बंब आणि शिक्षकांमधील संघर्ष चांगलाच पेटला आहे. पावसाळी अधिवेशनात आ. प्रशांत बंब यांनी शासकीय सेवेतील शिक्षकांबाबत केलेल्या विधानाविरोधात आज औरंगाबादेत शिक्षकांनी भव्य मोर्चा काढला.

औरंगाबादेत आमखास मैदान ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत शिक्षक सन्मान रॅलीचे आयोजन करण्यात आले. राज्यभरातील हजारो शिक्षक या आंदोलनात सहभागी झाले आहेत. प्रशांत बंब यांच्या निषेधाच्या टोप्याही शिक्षकांनी घातल्या. पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण, आ. विक्रम काळे, शिक्षक भारतीचे कपिल पाटीलदेखील आंदोलनात सहभागी झाले होते.

नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात आमदार प्रशांत बंब म्हणाले होते की, जिल्हा परिषद शाळेतील अनेक शिक्षक मुख्यालयी राहत नाहीत. अशा शिक्षकांमुळेच राज्यातील शाळांचा दर्जा घसरलेला आहे. तसेच अशा शिक्षकांचे भत्तेही बंद करायला हवेत. त्यांच्या या वक्तव्याचा राज्यभरातील जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी निषेध केला.

अशैक्षणिक कामेच अधिक
आंदोलनात सहभागी झालेल्या शिक्षकांनी म्हटले आहे की, अधिवेशनात प्रशांत बंब यांनी शिक्षकांबद्दल अतिशय लज्जास्पद वर्तन केले. शिक्षक मुख्यालयी राहत नाहीत. गुणवत्तापूर्ण काम करत नाहीत, असे बेताल वक्तव्य केले. मात्र, शिक्षकांच्या मागे अनेक अशैक्षणिक कामे असतात. हा सर्व भार सांभाळून ते शिक्षणदानाचे काम करतात. याबाबत प्रशांत बंब यांनी कधी आवाज उठवल्याचे ऐकले नाही.

मख्यालयी शौचालयाचीही सोय नाही
मुख्यालयी जिल्हा परिषदेचे शिक्षक राहत नाही, या आरोपावर आंदोलक म्हणाले की, अनेक गावांमधील मुख्यालयात एका ठिकाणी १२-१२ शिक्षकांची नियुक्ती केली जाते. तेथील खोल्यांमध्ये साधी शौचालयाची सुविधाही पुरवली जात नाही. प्रत्येक शिक्षकाला राहण्यासाठी चांगली खोली व शौचालयाची सुविधा दिल्यास शिक्षक मुख्यालयी का राहणार नाहीत, असा सवाल आंदोलकांनी केला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या