16.8 C
Latur
Thursday, December 1, 2022
Homeराष्ट्रीयव्यावसायिक सिलिंडर ११५ रुपयांनी स्वस्त

व्यावसायिक सिलिंडर ११५ रुपयांनी स्वस्त

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : १ नोव्हेंबर रोजी गॅस सिलिंडरचे दर वाढणार की, कमी होणार, याबाबत धाकधूक होती. तथापि, घरगुती गॅसचे दर कायम ठेवले. मात्र, देशभरातील व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात ११५.५० रुपयांनी कपात केली आहे. त्यामुळे व्यावसायिक गॅस स्वस्त झाला आहे. दरम्यान, घरगुती गॅसच्या किमती ६ जुलैपासून स्थिर आहेत.

व्यावसायिक गॅस सिलिंडर स्वस्त झाल्याने दिल्लीत १९ किलोच्या इंडेन एलपीजी सिलेंडरची नवीन किंमत आता १७४४ रुपये झाली आहे. या अगोदर ती १८५९.५ रुपये होती. मुंबईत १८४४ मध्ये व्यावसायिक सिलेंडर उपलब्ध होते, ते आता १६९६ रुपयांना मिळणार आहे. चेन्नईमध्ये हा सिलिंडर १८९३ रुपयांना मिळणार आहे. या अगोदर २००९.५० रुपये मोजावे लागत होते. आता कोलकात्यात व्यावसायिक सिलेंडरची किंमत १८४६ रुपये असेल, ती आधी १९९५.५० रुपये होती.

देशातील गॅस कंपन्या प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी १४ किलो घरगुती आणि १९ किलो व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत निश्चित करतात. यापूर्वी १ ऑक्टोबर रोजी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात २५.५ रुपयांची कपात करण्यात आली होती, तर घरगुती गॅस सिलिंडरच्या दरांत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या