20.1 C
Latur
Monday, January 30, 2023
Homeमहाराष्ट्रनाशिकमध्ये कंपनीत स्फोट, २५ ते ३० कामगार अडकले

नाशिकमध्ये कंपनीत स्फोट, २५ ते ३० कामगार अडकले

एकमत ऑनलाईन

नाशिक : नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच नाशिकमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. नाशिकच्या इगतपुरी मुंडेगावजवळ असलेल्या जिंदाल कंपनीत स्फोट झाला. स्फोटानंतर आग लागली आहे. घटनेत दोन महिलांचा मृत्यू झाला असून कंपनीत २५ ते ३० कामगार असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आतापर्यंत ३ जणांना रेस्क्यू करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, इगतपुरी मुंडेगावजवळ असलेल्या जिंदाल कंपनीत आज सकाळी स्फोट झाला. पॉलिफिल्मची निर्मिती करणा-या जिंदाल ग्रुपच्या या कंपनीत आधी स्फोट झाला आणि या स्फोटामुळे आग लागली. या आगीमध्ये काही कर्मचारी गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. तर काही कर्मचारी हे आत अडकल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या आगीचे लोळ दूरवर दिसत होते. नाशिक ग्रामीण अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत.

कंपनीत २५ ते ३० कामगार, कर्मचारी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ३ गंभीर जखमी कामगारांना, रेस्क्यू टीमने बाहेर काढले आहे. नाशिकच्या, जिल्हा सामान्य रुग्णालयात ५० बेडचा आणि इगतपुरीच्या एसएमबीटी मेडिकल कॉलेजमध्ये विशेष कक्ष तयार केला आहे.

जिल्हाधिका-यांसह, सर्व प्रमुख प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. आगीची भीषणता अजूनही दाहक आहे. महिंद्रा आणि महिंद्रा कंपनी, घोटी टोल नाका, इगतपुरी, त्रंबकेश्वर, सिन्नर आणि नाशिक येथून अग्निशमन दल आणि पंप घटनास्थळी दाखल झाले आहेत. आग अजूनही आटोक्यात नसल्याने बचावकार्यात मोठे अडथळे येत आहेत. घटनास्थळी ७ रुग्णवाहिका दाखल आहेत.

बचावकार्यात मोठ्या अडचणी
आग लागलेल्या शाफ्टजवळ अवघ्या १५० मीटर अंतरावर मोठा इंधन टँक आहे. या मोठ्या टाकीत, जवळपास २० हजार डिझेल असल्याची माहिती समोर आली आहे. जिंदाल कंपनीतील डिझास्टर यंत्रणा माहिती असलेला एकही जबाबदार अधिकारी घटनास्थळी नसल्याची माहिती समोर आली आहे. कंपनीतील आपत्कालीन यंत्रणेचा, माहिती नसल्याने अद्याप कोणताही उपयोग झाला नाही. प्रचंड धूर झाल्याने, बचावकार्यात प्रशासनाला अनेक अडचणी येत आहेत.

मुख्यमंत्र्यांची मदतीची घोषणा
इगतपुरी येथील घटनेत दोन महिलांचा मृत्यू झाला असून दोन्ही महिलांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदतीची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या