37.3 C
Latur
Saturday, May 28, 2022
Homeमहाराष्ट्रकेतकी चितळेविरोधात पुण्यात तक्रार

केतकी चितळेविरोधात पुण्यात तक्रार

एकमत ऑनलाईन

पुणे : टीव्ही अभिनेत्री केतकी चितळे ही वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. आता तिने पुन्हा एकदा असाच प्रकार केला असून यावेळी तिने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह शब्दात टीका केली आहे. केतकीने तिच्या फेसबूकवर एका व्यक्तीची कविता शेअर करत पवारांवर निशाणा साधला आहे.

केतकीच्या या पोस्टमुळे सोशल मीडियावर वादाला तोंड फुटले आहे. राष्ट्रवादीच्या गोटातून नेत्यांनी संताप व्यक्त करत केतकीवर कारवाईची मागणी केली आहे. जितेंद्र आव्हाड यांनीही केतकीच्या कृत्यावर टीका केली. तिच्याविरोधात कळव्यात गुन्हा दाखल झाला होता. यानंतर आता पुण्यात राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांनी केतकीच्या विरोधात तक्रार दाखल केल्याने तिला अटक होण्याची शक्यता आहे.
सायबर सेलकडे तक्रार दिली आहे.

केतकी चितळेने आपल्या फेसबूक पोस्टमध्ये शरद पवारांवर अत्यंत वाईट भाषेत टीका केली. नितीन भावे नावाच्या व्यक्तीच्या नावाने लिहिलेली ही पोस्ट आहे. अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टिका केल्याने केतकी विरोधात कळवा पोलिस ठाण्यामध्ये कलम ५००, ५०५(२), ५०१ आणि १५३ अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे पदाधिकारी स्वप्निल नेटके यांनी हा गुन्हा दाखल केला आहे.

तुकाराम महाराजांच्या अभंगाशी छेडछाड
यानंतर पुण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने शिवाजीनगर येथील सायबर सेलला तक्रार दाखल करण्यात आली आहे. शरद पवार यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट तसेच संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाची छेडछाड केल्याप्रकरणी लवकर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या