18.1 C
Latur
Friday, December 2, 2022
Homeमहाराष्ट्रराहुल गांधींविरोधात शिंदे गटाची पोलिसांत तक्रार

राहुल गांधींविरोधात शिंदे गटाची पोलिसांत तक्रार

एकमत ऑनलाईन

मुंबई : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. बाळासाहेबांची शिवसेना नेत्या वंदना सुहास डोंगरे यांनी राहुल गांधींविरोधात एफआयआर दाखल केला आहे. राहुल गांधी यांनी वीर सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्यासंदर्भात हा एफआयआर दाखल करण्यात आला.

खासदार राहुल गांधी यांच्याविरोधात ठाणे नगर पोलिस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली. राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान सावरकर यांची बदनामी करणारे वक्तव्य केले होते. त्यामुळे स्थानिक नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्या असल्याचे डोंगरे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. शिवसेना नेत्याच्या तक्रारीनंतर पोलिसांनी भादंवि कलम ५०० आणि ५०१ अंतर्गत गुन्हा दाखल केलाय. यापूर्वी सावरकरांच्या नातवानंही आजोबांचा ‘अपमान’ केल्याबद्दल राहुल गांधींविरुद्ध मुंबईत पोलिसांत तक्रार दाखल केली होती.

काय म्हणाले राहुल गांधी?
तुरुंगात असताना भीतीपोटी माफीनाम्यावर सही करून विनायक दामोदर सावरकर यांनी ब्रिटिशांना मदत केली. महात्मा गांधी आणि इतर भारतीय नेत्यांचा त्यांनी विश्वासघात केला असा दावा काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी केला. राहुल गांधी यांनी गेल्या मंगळवारी वाशिम जिल्ह्यात आयोजित सभेत हिंदुत्ववादी सावरकर यांच्यावर निशाणा साधला होता.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या