24.7 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeमहाराष्ट्रकॉम्रेड गोविंद पानसरे हत्या खटला कोल्हापूर न्यायालयामध्येच चालवा; एटीएसकडून राज्य सरकारला प्रस्ताव...

कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या खटला कोल्हापूर न्यायालयामध्येच चालवा; एटीएसकडून राज्य सरकारला प्रस्ताव सादर

एकमत ऑनलाईन

मुंबई : कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या खटला कोल्हापूर न्यायालयामध्येच चालवा, असा प्रस्ताव एटीएसकडून राज्य सरकारला सादर करण्यात आला आहे. याबाबतची माहिती आज कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये एटीएसचे अधीक्षक तुषार दोशी यांनी दिली. एटीएसकडून साक्षीदार आणि पंचांना कोल्हापूरहून सोलापूरला नेण्याचे जोखमीचे असल्याचे प्रस्तावात म्हटले आहे. दरम्यान, या प्रकरणी पुढील सुनावणी १९ सप्टेंबरला होणार आहे.

एटीएसकडून राज्य सरकारला सादर करण्यात आलेल्या प्रस्तावाची माहिती कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात देण्यात आली. पानसरे खटल्यातील साक्षीदार, पंच कोल्हापूरमधील आहेत. सोलापूर एटीएसच्या कार्यक्षेत्रात कोल्हापूर येत असल्याने खटला कोल्हापूर न्यायालयामध्ये चालवण्याची मागणी एटीएसकडून न्यायालयात करण्यात आली.

दरम्यान, १९ सप्टेंबरपर्यंत राज्य सरकारकडून पानसरे खटला कोल्हापूर की सोलापूरमध्ये चालणार? याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता आहे.
एटीएस करणार हत्येचा तपास
दुसरीकडे कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाकडून करण्यात येणार आहे. पानसरे हत्या प्रकरणाचा तपास करणा-या राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष तपास पथकाने या प्रकरणातील महत्त्वाची कागदपत्रे दहशतवादविरोधी पथकाकडे सोपवली आहेत.

कोल्हापूरमध्ये कॉम्रेड गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नीवर मॉर्निंग वॉक दरम्यान १६ फेब्रुवारी २०१५ रोजी गोळ्या झाडण्यात आल्या. उपचार सुरू असताना काही दिवसांनी कॉम्रेड पानसरे यांचे निधन झाले. कॉ. पानसरे हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीच्या विशेष पथकाकडून सुरू होता.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या