23.3 C
Latur
Saturday, August 8, 2020
Home लातूर चिंता वाढली : लातूर जिल्ह्यात कोरोनाबळीचे शतक

चिंता वाढली : लातूर जिल्ह्यात कोरोनाबळीचे शतक

तब्बल १८८ रुग्णांची भर, एकूण रुग्णसंख्या २३११ वर

लातूर : जिल्ह्यात गेल्या १५ दिवसांपासून कडक लॉकडाऊन सुरू आहे. या काळात कोरोना रुग्णांची संख्या हळूहळू कमी होण्याऐवजी कोरोनाचा अक्षरश: कहर सुरू असून, शनिवारी कोरोनाची रुग्णसंख्या विक्रमी १८८ नोंदली गेली. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या २३११ वर गेली आहे. त्यामुळे जिल्हावासीयांची चिंता वाढली आहे. कोरोनाच्या या वाढत्या रुग्णसंख्येबरोबरच बाधितांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढत असून, आज आणखी ५ रुग्णांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील कोरोना बळीने शतक गाठले आहे.

जिल्ह्यातून काल आलेल्या ४८२ जणांच्या स्वॅबचा तपासणी अहवाल शनिवारी प्राप्त झाला असून, यापैकी तब्बल ११९ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, तर ३१५ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून, ४७ जणांचा अहवाल अनिर्णित, तर १ जणाचा अहवाल रद्द करण्यात आला. यासोबतच आज जिल्ह्यात तब्बल ३९२ रॅपिड अ‍ँटीजन टेस्ट करण्यात आल्या. त्यापैकी ३२३ जणांचा अहवाल निगेटिव्ह, तर ६९ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. रॅपिड टेस्टमध्ये सर्वाधिक १५ रुग्ण येथील मुला-मुलींच्या वसतिगृहात सापडले. तसेच ग्रामीण रुग्णालय औसा येथे १०, उपजिल्हा रुग्णालय निलंगा येथे ९, सामान्य रुग्णालय उदगीर येथे ७, टीएचओ औसा येथे ५, पीएचसी नळेगाव येथे ६, ग्रामीण रुग्णालय किल्लारी येथे ३, फुलाबाई बनसोडे आणि गॅलेक्सी हॉस्पीटल येथे प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे.

त्यामुळे आज तब्बल १८८ नव्या रुग्णांची भर पडली आहे. यापैकी १७९ रुग्ण पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील, तर ९ रुग्णांची नव्याने नोंद झाली आहे. आता जिल्ह्यातील रुग्णसंख्या तब्बल २३११ वर गेली आहे. त्यापैकी १२८४ रुग्ण बरे होऊन घरी परतले असून, ९२७ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात मोठ्या संख्येने रुग्ण वाढत असल्याने रिकव्हरी रेट ५५.५ पर्यंत खाली आला आहे. दरम्यान, कोरोनाबाधितांच्या मृत्यूने शतक गाठले आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

९२७ पैकी ८८६ रुग्णांची लक्षणे सौम्य
जिल्ह्यात अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ९२७ आहे. दिलासादायक म्हणजे यापैकी तब्बल ८८६ रुग्णांची लक्षणे सौम्य आहेत. याबरोबरच १६ जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले असून, २५ जण ऑक्सीजनवर आहेत, असे जिल्हा शल्य चिकित्सकांच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

२८ रुग्णांना सुटी
जिल्ह्यात रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. त्या तुलनेत बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण घटले आहे. शनिवारी जिल्ह्यात तब्बल १८८ रुग्णांची भर पडली. मात्र, केवळ २८ रुग्णांनाच बरे झाल्याने सुटी मिळाली. त्यामध्ये लातूरमधील १७, औसा ५, निलंगा ४, चाकूर तालुक्यातील २ रुग्णांचा समावेश आहे.

Read More  शारदाताई टोपे यांचे दीर्घ आजाराने निधन

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,136FansLike
92FollowersFollow