22.2 C
Latur
Friday, August 19, 2022
Homeमहाराष्ट्रमुख्यमंत्री शिंदेंच्या हस्तेच होणार आषाढीची सशर्त महापूजा

मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्तेच होणार आषाढीची सशर्त महापूजा

एकमत ऑनलाईन

मुंबई : अचारसंहितेमुळे पंढरपुरात आषाढी एकादशीची विठ्ठलाची महापूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार की नाही याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. पण आता हा संभ्रम दूर झाला असून मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्तेच सपत्नीक आषाढीची महापूजा पार पडणार आहे, यासाठी निवडणूक आयोगाने हिरवा कंदील दाखवला आहे. उद्या रविवारी विठ्ठलाची शासकीय महापूजा पार पडणार आहे.

राज्यात काल नगरपालिका निवडणुकांची घोषणा झाली त्यामुळे लगेचच आचारसंहिताही लागू झाली आहे. यापार्श्वभूमीवर सोलापूरच्या जिल्हा प्रशासनाने आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन होऊ नये याची खबरदारी घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याबाबत परवानगी मागितली होती. यावर आता निवडणूक आयोगानं सशर्त परवानगी दिली आहे.

शिंदेंच्या दौऱ्यासाठी अटी
पंढरपूरच्या दौऱ्यात मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांना कोणत्याही निधीची आणि कार्यक्रमांची घोषणा करता येणार नाही.

पंढरपूरमधील ठरलेल्या कार्यक्रमांना नियमानुसार परवानग्या घेणं आवश्यक

कार्यकर्त्यांचा मेळावा घ्यायचा असल्यास ठराविक अटींचं पालन करणं आवश्यक

पंढरपुरात मुख्यमंत्र्यांचा कसा आहे कार्यक्रम?

एकादशी दिनी पहाटे शासकीय महापूजा होणार

विठ्ठलाची महापूजा झाल्यानंतर इस्कॉन आंतरराष्ट्रीय मंदिराचा भूमिपूजन

सकाळी ११ वाजता स्वच्छता दिंडी, दुपारी शिवसेना पक्षमेळावा

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या