23.2 C
Latur
Saturday, September 25, 2021
Homeआंतरराष्ट्रीयतालिबान आणि एनआरएफमध्ये संघर्ष वाढला

तालिबान आणि एनआरएफमध्ये संघर्ष वाढला

एकमत ऑनलाईन

काबूल : अफगाणिस्तानमधून मोठी घडामोड समोर येत आहे. पंजशीर व्हॅलीत तालिबानी आणि एनआरएफ यांच्यातली लढाईने वेग पकडला आहे. विशेष म्हणजे या लढाईत अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांचा भाऊ रोहुल्लाह सालेह हा ठार झाल्याची माहिती आहे. एवढच नाही तर पंजशीर व्हॅलीत जिथे तिथे तालिबानने कब्जा केला आहे. तिथे मोठ्या प्रमाणात लोकांना अत्याचर केले जात असल्याचही रिपोर्ट समोर येत आहे. नेमके किती लोकांना मारले गेले आहे. याचा निश्चित असा आकडा समोर आलेला नाही. पण पंजशीरमध्ये तुंबळ युद्ध सुरु असून, दोन्ही बाजूचा मृत्यूचा आकडा मोठा असल्याचे म्हटले आहे.

काही दिवसांपूर्वी माजी उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांनी पंजशीरमधल्या एका लायब्ररीत बसून एक व्हीडीओ जारी केला होता. आता तिच लायब्ररी पुन्हा एकदा चर्चेत आहे. कारण तालिबानचा एक दहशतवादी त्याच खुर्चीवर बसलेला एक फोटो तालिबानकडून जारी करण्यात आला आहे. याचाच अर्थ असा की, ज्या ठिकाणी बसून अमरुल्ला सालेह तालिबानला ललकारत होते त्याच ठिकाणी आता तालिबान पोहोचल्याचा दाखवले जात आहे. दरम्यान अहमद मसूदचा समर्थन करणारे मार्श दोस्तम यांनी ताजिकिस्तान, उज्बेकिस्तान तसच आंतरराष्ट्रीय समुदयाला आवाहन केले आहे. एनआरएफ आणि तालिबानमध्ये पंजशीरला घनघोर युद्ध सुरु आहे. त्याचा निकाल काहीही लागू शकतो. त्यामुळे तालिबानच्या सरकारला मान्यता देण्याची घाई करु नका, असे मार्शल दोस्तम यांनी म्हटले आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या