22.7 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeमुंबईत काँग्रेसचे जोरदार आंदोलन ; केंद्र सरकारचा निषेध

मुंबईत काँग्रेसचे जोरदार आंदोलन ; केंद्र सरकारचा निषेध

एकमत ऑनलाईन

मुंबई : नॅशनल हेराल्डप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना आज ईडीने चौकशीसाठी दिल्लीत कार्यालयात बोलावले आहे. त्यामुळे देशभरात काँग्रेसकडून ईडी आणि केंद्र सरकारचा निषेध सुरूय. मुंबईतही काँग्रेसच्या वतीने ईडी कार्यालयाबाहेरआंदोलन करण्यात आले.

ईडी विरोधातल्या या मोर्चात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, भाई जगताप यांच्यासह अनेक दिग्गज नेते सहभागी झालेत. भारतीय जनता पक्षाने राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्यावर दबाव टाकण्यासाठी या नोटीस दिल्याचा आरोप काँग्रेसच्या वतीने करण्यात येत आहे. मुंबईच्या आझाद मैदानापासून बॅलार्ड इस्टेट येथील ईडी कार्यालयावर काँग्रेसचा ईडीविरोधातला मोर्चा सध्या सुरू आहे. जब जब मोदी डरता है, तो ईडी को आगे करता है… अशा घोषणा देत काँग्रेस भाजप आणि ईडीविरोधात निषेध व्यक्त करत आहे.

बदनाम करण्याचा प्रयत्न
भाई जगताप म्हणाले, गांधी कुंटुबाला बदनाम करण्यासाठी भाजप सूडाचे राजकारण करत आहे. गेल्या आठ वर्षांपासून मोदी सरकारच्या कारवाया सुरूयत. या देशात स्वत: रक्त सांडणारा एकच परिवार आहे तो म्हणचे गांधी परिवार. स्वातंत्र्याच्या लढाईत भाजपचा एकही नेता त्यात नव्हता. त्यामुळे ते आज गांधी कुंटुबाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत.

गांधी कुंटुबाला क्लिन चिट
भाई जगताप पुढे म्हणाले की, नॅशनल हेराल्डप्रकरणी गांधी कुंटुबाला क्लिन चिट देण्यात आली. परंतु आता स्वत:चा अपयश खपवण्यासाठी तसेच नाकर्तेपणा लपवण्यासाठी मोदी गांधी कुटुंबाला बदनाम करत आहे. देशभरात सुरू असलेला महागाईचा आक्रोश, बेरोजगारी याला मोदी जबाबदार आहेत.

ही कारवाई सूडबुद्धीने
जेव्हा-जेव्हा मोदी घाबरतात तेव्हा ते केंद्रीय तपास यंत्रणाचा वापर करुन सूडबुद्धीने कारवाई करतात. राज्यातल्या काँग्रेस नेत्यांवर तसेच महाविकास आघाडी सरकारवर देखील केंद्राकडून कारवाया सुरू आहे. ईडी हे नरेंद्र मोदी आणि अमित शहांच्या इशा-यावर चालते.

कार्यकर्त्यांना अडवले
मुंबईत भाई जगताप आणि नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चाला पोलिसांनी अडवले आहे. ईडीच्या देशातील २५ कार्यालयांबाहेर निदर्शने करण्यात येत आहेत. जोपर्यंत राहुल गांधी ईडीच्या कार्यालयातून बाहेर पडत नाहीत, तोपर्यंत सर्व राज्यांमध्ये आंदोलने सुरूच राहणार आहे. त्यासाठी काँग्रेसने सर्व राज्यांमध्ये जय्यत तयारी केलीय.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या