25.8 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeराष्ट्रीयभारत जोडो यात्रेमुळे कॉंग्रेसला फायदा

भारत जोडो यात्रेमुळे कॉंग्रेसला फायदा

एकमत ऑनलाईन

सी व्होटर्सच्या सर्वेक्षणातील माहिती
थिरुवनंतपुरम : २०२४ मध्ये होणा-या लोकसभा निवडणुकीची वातावरण निर्मिती झाली आहे. भाजप, काँग्रेससह प्रत्येक पक्षाने निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. प्रत्येकजण आपापली रणनिती आखत आहे. याचाच भाग म्हणून काँग्रेसने राहुल गांधींच्या नेतृत्वात भारत जोडो यात्रा काढली आहे. कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत राहुल गांधींच्या नेतृत्वात भारत जोडो यात्रा होत आहे. स्थानिक पातळीवरील पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी काँग्रेसने हे पाऊल उचलले आहे. राहुल गांधींच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या भारत जोडो यात्रेवर सी व्होटरच्या मदतीने सर्व्हे केला आहे. या सर्वेक्षणात भारत जोडो यात्रेचा कॉंग्रेसला फायदा झाल्याची बाब समोर आली आहे.

सी व्होटर सर्व्हेमध्ये राहुल गांधी यांच्या कामकाजबाबात लोकांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. राहुल गांधींच्या कामकाजावर तुम्ही किती संतुष्ट आहात, असा प्रश्न लोकांना विचारण्यात आला. भारत जोडो यात्रामुळे राहुल गांधींना फायदा झाला आहे. राजकीय दृष्टी राहुल गांधींची किंमत आणखी वाढल्याची प्रतिक्रिया लोकांनी दिली. तामिळनाडू आणि केरळमध्ये याबाबतचा सर्व्हे केला आहे.

तामिळनाडूमध्ये काँग्रेसच्या भारत जोडो यात्रादरम्यान ११ सप्टेंबर रोजी ६३ टक्के जणांनी राहुल गांधींच्या कामकाजावर संतुष्ट असल्याचे सांगितले. याआधी ६ सप्टेंबर रोजी ५९ टक्के जणांनी संतुष्ट असल्याचे सांगितले होते. एका आठवड्यात राहुल गांधींच्या बाजूने मत करणा-यांची संख्या वाढल्याचे दिसून आले.

तामिळनाडूमध्ये किती जण असंतुष्ट?
६ सप्टेंबर रोजी तामिळनाडूमधील २५ टक्के लोकांनी राहुल गांधींच्या कामकाजावर असंतुष्ट असल्याचे सांगितले, तर ११ सप्टेंबर रोजी २२ टक्के जणांनी असंतुष्ट असल्याचे सांगितले. म्हणजेच गेल्या आठवड्याच्या तुलनेत असंतुष्ट लोकांची संख्या कमी झाल्याचे दिसले. याच प्रश्नावर ६ सप्टेंबर रोजी १६ टक्के जणांनी सांगू शकत नाही, असे उत्तर दिले तर ११ सप्टेंबर रोजी १५ टक्के लोकांना सांगू शकत नाही, असे उत्तर दिले.

केरळमधील काय स्थिती?
राहुल गांधी यांच्या कामकाजावर संतुष्ट आहात का? यासंदर्भात केरळमधील लोकांनीही आपली प्रतिक्रिया दिली. १० सप्टेंबर रोजी केरळमधील ५६ टक्के जण संतुष्ट होते, तर १४ सप्टेंबर रोजी संतुष्ट लोकांची संख्या वाढून ६० टक्के झाली. काँग्रेसची भारत जोडो यात्रा सुरु होण्याआधी आणि यात्रा सुरु झाल्यानंतरचा वरील डेटा आहे. १० सप्टेंबर रोजी ३१ टक्के जण राहुल गांधींच्या कामकाजावर असंतुष्ट होते, तर १४ सप्टेंबर रोजी ही संख्या ३० टक्के झाली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या