Wednesday, September 27, 2023

छत्तीसगडमध्ये कॉंग्रेसची न्याय योजना : शेतकऱ्यांच्या खात्यात थेट ७५०० रुपये

न्याय योजना सुरू झाल्याने संपूर्ण पक्षाला आनंद झाला : काँग्रेसच्या न्याय योजनेने शेतकऱ्यां फायदा होईल- सोनिया गांधी 

छत्तीसगड : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त छत्तीसगड सरकारने महत्वाकांक्षी योजना सुरू केली आहे. कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी राजीव गांधी किसान न्याय योजना सुरू केली आहे. न्याय योजना सुरू झाल्याने संपूर्ण पक्षाला आनंद झाला आहे, असं सोनिया गांधी म्हणाल्या. काँग्रेसच्या न्याय योजनेने शेतकऱ्यां फायदा होईल, असं देखील सोनिया गांधी यांनी सांगितलं.

सोनिया गांधी म्हणाल्या की राजीव गांधी यांचं अन्नदाता शेतकर्‍यांवर, विशेषत: महिला आणि आदिवासी शेतकर्‍यांवर खूप प्रेम होतं. म्हणून ते वेळोवेळी त्यांच्यांमध्ये जाऊन संवाद साधत असत आणि समस्यांबद्दल माहिती घेत. शेतकरी आणि शेती ही भारताच्या विकासाचं खरं भांडवल आहे असा त्यांचा विश्वास होता.

Read More  केवळ अधिक चाचण्या केल्यानं कोरोनापासून वाचवता येणार नाही-देवेंद्र फडणवीस

शेतकऱ्यांना सक्षम बनविण्याचा एकमेव मार्ग म्हणजे खात्यावर निधी थेट पाठवणे
दरम्यान, कॉंग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले की, राजीव गांधी किसान न्याय योजनेची ऐतिहासिक सुरुवात मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या नेतृत्वात छत्तीसगडमध्ये झाली. १९ लाख धान्य, मका आणि ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या खात्यात ७,५०० रुपये थेट जातील. आज १,५०० कोटींचा पहिला हप्ता जाईल. आशा आहे की भारत सरकार या अनोख्या उपक्रमातून शिकेल. त्याचवेळी छत्तीसगड कॉंग्रेसने म्हटलं आहे की, राहुल गांधींनी नोबेल पुरस्कार विजेते महान अर्थशास्त्रज्ञ अभिजीत बॅनर्जी यांच्याशी चर्चा केली तेव्हा ते देखील म्हणाले की शेतकऱ्यांना सक्षम बनविण्याचा एकमेव मार्ग म्हणजे त्यांच्या खात्यावर निधी थेट पाठवणे होय. आज आम्ही ते करुन दाखवलं.

 पहिल्या हप्त्यासाठी १५०० कोटी रुपये

छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल म्हणाले की या योजनेंतर्गत धान्य पिकासाठी १८ लाख ३४ हजार ८३४ शेतकऱ्यांना पहिल्या हप्त्यासाठी १५०० कोटी रुपये दिले जातील. या योजनेचा लाभ ९ लाख ५३ हजार ७०६ अल्पभूधारक शेतकरी, ५ लाख ६० हजार २८४ लघु शेतकरी आणि ३ लाख २० हजार८४४ बडय़ा शेतकऱ्यांना होणार आहे.

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या