24.8 C
Latur
Saturday, November 27, 2021
Homeमहाराष्ट्रकाँग्रेस नेते अस्लम शेख यांना कोरोनाची लागण

काँग्रेस नेते अस्लम शेख यांना कोरोनाची लागण

एकमत ऑनलाईन

मुंबई : मुंबईचे पालकमंत्री आणि काँग्रेस नेते अस्लम शेख यांना कोरोनाची लागण झाली आहे. अस्लम शेख यांनी ट्विटरवरुन याविषयी माहिती दिली आहे.

‘मी कोरोना पॉझिटिव्ह आढळलो आहे. मला सध्या कोणतीही लक्षणे नसून स्वत:ला विलग (आयसोलेट) करुन घेत आहे. माझ्या निकटच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोना चाचणी करुन घ्यावी’ अशी विनंतीही अस्लम शेख यांनी केली. ‘मी माझ्या राज्यातील लोकांची सेवा करण्यासाठी घरातून काम करत राहणार आहे.’ असेही अस्लम शेख यांनी सांगितले कोरोना काळात अस्लम शेख यांनी मुंबईतील अनेक कोरोना हॉटस्पॉट भागात त्यांनी पाहणी दौरे केले आहेत.

Read More  संपादकीय : भय इथले संपत नाही़!

यापूर्वी राज्यातील महाविकासआघाडीतील राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यासोबत काँग्रेसचे नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनाही कोरोनाची लागण झालेली. हे तिन्ही मंत्री कोरोनावर मात करत आपल्या घरी परतले आहेत.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या