22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeमहाराष्ट्रकाँग्रेसच्या नेत्यांनी संवाद साधताना ‘जय बळिराजा’ म्हणावे

काँग्रेसच्या नेत्यांनी संवाद साधताना ‘जय बळिराजा’ म्हणावे

एकमत ऑनलाईन

मुंबई : काँग्रेस कार्यकर्त्यांनी संवाद साधताना ‘जय बळिराजा’ म्हणावे अशी सूचना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कर्याकर्त्यांना दिली आहे. महाराष्ट्रातील सर्व शासकीय कार्यालयांतील अधिका-यांसह कर्मचारी फोनवर ‘हॅलो’ न म्हणता ‘वंदे मातरम्’ म्हणत संभाषणाला सुरुवात करतील, अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केल्यापासून राज्यात नव्या वादाला सुरुवात झाली आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मुनगंटीवार यांनी ही घोषणा करताच, विरोधकांनी आक्षेप घेतला आहे. दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना ‘हॅलो’ ऐवजी ‘जय बळिराजा’ म्हणा अशी सूचना दिली आहे.

वंदे मातरम् आमचा स्वाभिमान पण बळिराजा जगाचा पोशिंदा आहे. वंदे मातरम्ला आमचा विरोध नाही. मात्र, जय बळिराजा म्हणणे यामागे आमची शेतक-यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची भावना आहे. बळिराजा हा देशाचा पोशिंदा आहे. त्याचा सन्मान करण्यासाठी आम्ही ‘जय बळिराजा’ म्हणणार असल्याचे नाना पटोले यांनी म्हटले आहे.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर झाले. या खातेवाटपामध्ये सुधीर मुनगंटीवार यांना सांस्कृतिक मंत्री करण्यात आले. सांस्कृतिक मंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारताच मुनगंटीवार यांनी शासकीय कर्मचारी आणि अधिका-यांना फोनवर हॅलो म्हणण्याऐवजी वंदे मातरम् म्हणण्याच्या सूचना केल्या.

दरम्यान, यावरून वादाला तोंड फुटले आहे. अशी जोरजबरदस्ती करू नका. हा देश स्वतंत्र आहे. स्वातंत्र्य मिळाले ते मोकळा श्वास घेण्यासाठी, श्वास कुठून कसा घ्यावा तो पण तुम्हीच ठरवणार का? इतकाही भारताचा गळा घोटण्याचा प्रकार करू नका. मला हॅलोच म्हणायचे आहे. मला जय भीम म्हणायचे आहे. आता ते जबरदस्ती आमच्याकडून म्हणवून पण घेणार की जबरदस्ती जेलमध्ये टाकणार, असे आव्हाड यांनी म्हटले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या