23.1 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeकाँग्रेस आमदार अदिती सिंह पक्षातून निलंबित

काँग्रेस आमदार अदिती सिंह पक्षातून निलंबित

एकमत ऑनलाईन

रायबरेली: उत्तर प्रदेशमधील रायबरेली येथील आमदार आदिती ंिसग यांना काँग्रेसने पक्षातून निलंबित केले आहे. अदिती या काँग्रेसच्या महिला शाखेच्या सरचिटणीसही होत्या. पक्षाने त्यांना बाहेरचा रस्ता दाखविला आहे. आपण या निर्णयाचे स्वागत केले, असल्याचे अदिती यांनी म्हटले आहे. काँग्रेस आणि भाजपा यांच्यात मजुरांसाठीच्या बसवरून निर्माण झालेल्या संघर्षात ट्विट करुन अदिती यांनी स्वत: च्या पक्षाला लक्ष्य केले होते.

Read More  कोरोनानंतरही खेळाडू आणि चाहत्यांच्या मनात भीती कायम असेल: राहुल द्रविड

अदिती सिंह यांच्यावर कॉंग्रेसने पक्षविरोधी कारवाया केल्याचा आरोप केला आहे. आदिती यांना कारणे दाखवा नोटीस बजावून पक्षाने जाबही विचारला आहे. सध्या अदिती या पक्षातून आणि पक्षाच्या महिला शाखेच्या पदावरून निलंबित आहेत. काँग्रेसच्या आमदार अदिती यांचे गांधी कुटुंबाशी अगदी जवळचे संबध होते. मात्र, बसच्या मुद्द्यावरून आदिती यांनी यूपी सरकार आणि प्रियंका गांधी यांच्यात चाललेल्या बसच्या राजकारणाबद्दल काँग्रेसवरच टीका केली होती. बसगाड्या उपलब्ध असतील तर त्या राजस्थान, पंजाब आणि महाराष्ट्रात का लावल्या गेल्या नाहीत?, असा सवाल अदिती यांनी उपस्थित केला होता. या कोरोना संकटाच्या काळात काँग्रेसने निकृष्ट राजकारण करू नये असेही अदिती यांनी काँग्रेसला सुनावले होते.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या