18.1 C
Latur
Friday, December 2, 2022
Homeनांदेडकाँग्रेस अध्यक्ष खरगे, राष्ट्रवादीचे पाटील, खा. सुळे नांदेडात दाखल

काँग्रेस अध्यक्ष खरगे, राष्ट्रवादीचे पाटील, खा. सुळे नांदेडात दाखल

एकमत ऑनलाईन

नांदेड : काँग्रेसची भारत जोडो यात्रा गुरूवार दि. १० नोव्हेंबर रोजी सकाळी नांदेड शहरात दाखल झाली. यात्रेत सहभागी होण्यासाठी आणि सायंकाळी होणा-या सभेसाठी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खा. सुप्रिया सुळे यांचे नांदेडात आगमन झाले आहे.

कुष्णूर, नायगाव ते कापशी गुंफा या मार्गे भारत जोडो यात्रा चौथ्या दिवशी गुरूवारी सकाळी खा. राहुल गांधी यांच्यासह ही यात्रा नांदेडात दाखल झाली. चंदासिंग कार्नर, देगलूर नाका येथे यात्रेचे जोरदार स्वागत झाले. हजारो जण या यात्रेत सहभागी झाले होते. या पदयात्रेनंतर सायंकाळी साडे चारच्या सुमारास राहुल गांधी यांची नवा मोंढा मैदानावर जाहीर सभा होत असून या यात्रेसह सभेस उपस्थित राहण्यासाठी कॉगे्रसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लीकार्जुन खरगे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खा. सुप्रिया सुळे यांचे विमानाने दुपारच्यावेळी नांदेडात आगमन झाले. यावेळी खरगे यांनी शासकीय विश्रामगृहात नेते, पदाधिका-यांशी संवाद साधला तर खा. सुळे यांनी सचखंड गुरूव्दारा येथे जाऊन दर्शन घेतले. यावेळी माध्यमांशी बोलताना खा. सुळे म्हणाल्या की, खा. संजय राऊत यांना जामीन मिळाला, असाच न्याय नवाब मलिक व अनिल देशमुख यांना मिळावा ही अपेक्षा आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या