24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeराष्ट्रीयकाँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना दुस-यांदा कोरोना

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना दुस-यांदा कोरोना

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना दुस-यांदा कोरोनाची लागण झाली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते जयराम रमेश यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. जयराम रमेश यांनी सोशल मीडियावर यासंदर्भातील पोस्ट शेअर केली आहे.

आज काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची कोविड-१९ चाचणी पॉझिटिव्ह आली असून, सरकारने जारी केलेल्या प्रोटोकॉलनुसार त्या आयसोलेशनमध्ये आहेत, असे जयराम रमेश यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. तीन दिवसांपूर्वी सोनिया गांधी यांची मुलगी आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनाही कोरोनाची लागण झाली होती.

लोकसभेच्या माजी अध्यक्षा मीरा कुमारही कोरोना पॉझिटिव्ह
लोकसभेच्या माजी अध्यक्षा मीरा कुमार यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्विट करून सांगितले की, मी काल रात्री पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह झाले आहे. खबरदारी म्हणून मी या काळात होम क्वारंटाईनमध्ये राहीन. माझ्या संपर्कात आलेल्यांनी कोरोना प्रोटोकॉलचे पालन करून चाचण्या करून घ्याव्यात, असे आपल्या पोस्टमध्ये मीरा कुमार यांनी लिहिले होते

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या