25 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeराष्ट्रीयकाँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींना कोरोनाची लागण

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींना कोरोनाची लागण

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाली आहे. प्रियंका गांधीही त्यांच्या संपर्कात आल्याची माहिती समोर आली आहे.

सोनिया गांधींचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर प्रियंका गांधी लखनौ दौ-याहून माघारी परतल्या असून अद्याप त्यांची कोविड चाचणी करण्यात आलेली नाही.

काँग्रेसच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांमध्ये सोनिया गांधी यांनी अनेक नेत्यांशी भेटीगाठी घेतल्या होत्या. त्यापैकी काही नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. सोनिया गांधींना कोरोनाची सौम्य लक्षणे दिसून येत आहेत. त्यांना काही दिवसांपासून ताप येत होता. त्यामुळे त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती. त्यानंतर त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर सोनिया गांधींनी स्वत:ला आयसोलेट केले आहे. तसेच, संपर्कात आलेल्या सर्वांना काळजी घेण्याचे आवाहनही केले आहे. गेल्या काही दिवसांत प्रियंका गांधी या सोनिया गांधी यांच्यासोबत होत्या. त्यामुळे सोनिया गांधींना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळताच, त्यांनी आपला लखनौ दौरा रद्द केला असून त्या दिल्लीला परतल्या आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या