27 C
Latur
Saturday, August 13, 2022
Homeमहाराष्ट्रईडीविरोधात मुंबईत काँग्रेसचे आंदोलन; नाना पटोलेंना पोलिसांनी घेतले ताब्यात

ईडीविरोधात मुंबईत काँग्रेसचे आंदोलन; नाना पटोलेंना पोलिसांनी घेतले ताब्यात

एकमत ऑनलाईन

मुंबई : काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची सक्तवसुली संचालनायकडून (ईडी) चौकशी सुरू असून, याविरोधात पक्षाकडून देशभरात आंदोलन केलं जात आहे. दरम्यान राजधानी दिल्लीमधील आंदोलनात सहभागी झालेले राहुल गांधी यांच्यावर पोलिसांनी कारवाई करत त्यांना ताब्यात घेतलं आहे. यानंतर आता काँग्रेस नेते नाना पटोले यांनादेखील पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ईडीच्या कारवाईविरोधात ते मुंबईत आंदोलन करत होते. यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे.

नाना पटोले यांना पोलीस ताब्यात घेत असताना काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे. ‘‘जब जब मोदी डरता है, पोलीस को आगे करता है’’ अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या आहेत.

नाना पटोले यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, ‘‘महात्मा गांधी यांच्या विचाराने सत्याग्रही पद्धतीनं आणि अंहिसेच्या मार्गाने हे आंदोलन सुरू असताना केंद्रातील हुकूमशाही सरकारने ज्या पद्धतीने दबावतंत्राचा अवलंब केला आहे. त्या दबावतंत्राच्या विरोधात आमचं हे आंदोलन आहे. आता जशाला तसे उत्तर देण्याची भूमिका काँग्रेस पक्षानं घेतली आहे. देशाला बुडवणारी व्यवस्था जी केंद्रात बसली आहे. त्याच्याविरोधात आमचं आंदोलन आणखी तीव्र करण्यात येणार आहे.’’

याआधी २१ जुलै रोजी ईडीने सोनिया गांधी यांना चौकशीसाठी ईडी कार्यालयात बोलावलं होतं. त्यांची दोन तास चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा ईडीने सोनिया गांधी यांना चौकशीसाठी बोलावलं आहे. त्यामुळे देशभरात अनेक ठिकाणी काँग्रेस नेते, कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. ईडीच्या कारवाईविरोधात ते रस्त्यावर उतरले असून आंदोलन करत आहेत. ‘नॅशनल हेराल्ड’ प्रकरणात गेल्या महिन्यात राहुल गांधी यांनाही चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. त्यांचीही चौकशी करण्यात आली होती.

नागपुरात काँग्रेस आंदोलनाला हिंसक वळण
नागपुरात काँग्रेसच्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे पाहायला मिळाले. युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जीपीओ चौकात गाडी पेटवून दिली. त्यामुळे परिसरात तणाव पाहायला मिळाले. या प्रकारानंतर पोलिसांनी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या