24 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeराष्ट्रीयमहागाईविरोधात रविवारी कॉंग्रेसची दिल्लीत रॅली

महागाईविरोधात रविवारी कॉंग्रेसची दिल्लीत रॅली

एकमत ऑनलाईन

रामलीला मैदानावर महागाईपर हल्लाबोल
नवी दिल्ली : वाढती महागाई, बेरोजगारी आणि जीएसटीवरून भाजप सरकारला घेरण्याची तयारी काँग्रेसने केली आहे. उद्या म्हणजे ४ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता दिल्लीतील रामलीला मैदानावर काँग्रेसकडून रॅली काढण्यात येणार आहे. महागाई पर हल्लाबोल असे या रॅलीचे नाव असणार आहे.

काँग्रेस कमिटीच्या मुख्यालयातून उद्या सकाळी ९ वाजल्यापासून बसेस सुरू होतील. काँग्रेस नेते राहुल गांधी पक्ष मुख्यालयातून बसने दिल्लीतील रामलीला मैदानावर येणार आहेत. त्यांच्यासोबत काँग्रेसचे असंख्य कार्यकर्ते असणरा आहेत. या रॅलीत महागाई, बेरोजगारी आणि जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी लागू करण्यावरून केंद्रातील मोदी सरकारवर चौफेर हल्लाबोल करण्यात येणार आहे. या रॅलीत दिल्लीशिवाय हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील पक्षाचे कार्यकर्तेही सहभागी होणार आहेत.

काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेते सकाळी १० वाजता पक्ष मुख्यालयातून बसमध्ये बसून रामलीला मैदानाकडे रवाना होतील. त्याच बसमध्ये राहुल गांधीही सभेला जाऊ शकतात. ७ सप्टेंबरपासून काश्मीर ते कन्याकुमारी भारत जोडो यात्रेचे काँग्रेसकडून आयोजन करण्यात येणार आहे. त्याआधी उद्याचे आंदोलन होणार आहे. देशातील वाढत्या महागाईवरून भाजपवर सातत्याने निशाणा साधला जात आहे. महागाई आणि बेरोजगारी हे सर्वसामान्यांचे प्रश्न असून ते प्रत्येक व्यासपीठावर मांडणार असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. त्याच पार्श्वभूमीवर उद्या हे आंदोलन करण्यात येणार आहे.

काँग्रेसने ५ ऑगस्ट रोजीदेखील महागाई आणि बेरोजगारीविरोधात देशव्यापी आंदोलन केले होते. काँग्रेसने महागाई आणि बेरोजगारीबाबत केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे रविवारीदेखील काँग्रेसकडून महागाईविरोधात आंदोलन करण्यात येणार आहे. काँग्रेसच्या मुख्य नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती दिली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या