31.2 C
Latur
Wednesday, June 7, 2023
Homeराष्ट्रीयकर्नाटकात कॉंग्रेसलाच बहुमत मिळणार

कर्नाटकात कॉंग्रेसलाच बहुमत मिळणार

एकमत ऑनलाईन

एबीपी-सी वोटरच्या निवडणूकपूर्व सर्वेक्षणाचा अंदाज
बंगळुरू : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. सर्वच पक्षांनी जोरदार प्रचार केला आहे. भाजप, काँग्रेससह इतर अन्य पक्षांनी सत्तेचा दावा केला आहे. कर्नाटक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एबीपी-सी वोटरच्या महाओपिनिअन पोल घेतला. यात कॉंग्रेसलाच बहुमत मिळेल, असा अंदाज वर्तवला आहे.

सध्या अवघ्या देशाचे लक्ष लागले ते कर्नाटकात…. कर्नाटकात निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे… पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी कर्नाटकात तळ ठोकून आहेत… प्रचाराच्या तोफा धडाडतायत… अशात कर्नाटकची जनता कुणाला कौल देणार, कर्नाटकात कुणाचे सरकार बनणार, या प्रश्नांची उत्तर मिळवण्यासाठी एबीपी आणि सी वोटरचा महाओपिनियन पोल घेण्यात आला… या सर्व्हेनुसार कर्नाटकात काँग्रेस बहुमताचा आकडा गाठण्याची शक्यता आहे… बसवराज बोम्मईंना मोठा धक्का बसण्याची शक्यता ओपिनिअन पोलमधून वर्तवण्यात आली आहे. २२४ जागांसाठी १० मे रोजी कर्नाटकात मतदान होणार आहे… आणि १३ मे रोजी निकाल लागणार आहे.

२२४ सदस्यीय कर्नाटक विधानसभेचा सध्याचा कार्यकाळ २४ मे रोजी संपत आहे. कर्नाटकातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. भाजप, काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दल निवडणुकीच्या रिंगणात असले तरी खरी लढत ही भाजप आणि काँग्रेसमध्येच आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेस सत्तेत येणार असल्याचा ओपिनियन पोलचा अंदाज आहे. राज्य सरकारच्या कामकाजावर जनता नाराज असल्याचे सर्व्हेतून दिसून येत आहे.

Stay Connected

1,567FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या