26.2 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeमहाराष्ट्रकाँग्रेस कार्यकर्ते आक्रमक; बोरिवली स्थानकात रेल्वे थांबवण्याचा प्रयत्न!

काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक; बोरिवली स्थानकात रेल्वे थांबवण्याचा प्रयत्न!

एकमत ऑनलाईन

मुंबई : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर होत असललेल्या ईडीच्या चौकशीला विरोध दर्शवण्यासाठी काँग्रेसकडून ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतही काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले असून बोरिवली रेल्वे स्थानकात त्यांनी रेल रोको आंदोलन केले आहे.

काही कार्यकर्ते हातात काँग्रेसचे झेंडे घेऊन रेल्वे स्थानकात दाखल झाले, जोरदार घोषणाबाजी करत ते थेट रेल्वे रुळावर दाखल झाले. यानंतर त्यांनी रेल्वे रोखण्याचा प्रयत्न केला पण यात ते अयशस्वी ठरले. या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले, अशी माहिती मध्य रेल्वेच्या पीआरओंनी दिली.

दरम्यान, नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी सध्या सोनिया गांधी यांना ईडीकडून तिस-यांदा चौकशीसाठी समन्स पाठवण्यात आले आहे. सोनिया गांधींना वारंवार चौकशीसाठी बोलावण्यात येऊन त्यांचा छळ केला जात असल्याची भावना काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आहे, त्यामुळे त्यांनी आज पुन्हा देशभरात आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या