26.9 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeमहाराष्ट्र  पुण्यात मनपा निवडणुकीसाठी काँग्रेसचे ‘एकला चलो रे’

  पुण्यात मनपा निवडणुकीसाठी काँग्रेसचे ‘एकला चलो रे’

एकमत ऑनलाईन

पुणे : आगामी पुणे महापालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार आहे. पुणे शहर जिल्हा काँग्रेस कोअर कमिटीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. काँग्रेस भवन येथे ही बैठक आज पार पडली असून पुणे महानगरपालिका निवडणूक काँग्रेस पक्षाने स्वबळावर लढवावी अशी सर्व नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मागणी केली होती.

दरम्यान, येणा-या महापालिका निवडणुकीसाठी सर्व पक्षांकडून मोर्चेबांधणी करण्यात येत असून आज पुणे शहर जिल्हा काँग्रेस कोअर कमिटीची बैठक पार पडली. कोअर कमिटीच्या बैठकीमध्ये पुणे महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात सविस्तर चर्चा झाली. यावेळी सर्व कार्यकर्त्यांनी स्वबळावर लढण्याची मागणी केली होती.

कार्यकर्त्यांच्या तसेच सर्व नेतेमंडळींच्या आग्रही मागणीमुळे येणारी पुणे महानगरपालिकेची निवडणूक काँग्रेस पक्ष स्वबळावर लढणार असल्याची घोषणा पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरवंद शिंदे यांनी केली. त्याचबरोबर निवडणुकीसाठी इच्छुकांनी व कार्यकर्त्यांनी आपापल्या भागात प्रभागाची व पक्ष संघटनेची बांधणी करण्यास सुरुवात करावी अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.
काँग्रेसने मनपा निवडणुकीत स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्याने महाविकास आघाडीत बिघाडी होणार का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीची भूमिका काय असणार आहे याकडे लक्ष असणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या