इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या हत्येचा कट दहशतवाद्यांनी रचला आहे. यासाठी दहशतवाद्यांनी अफगाणिस्तानातील मारेक-याची मदत मागितली आहे.
दहशतवादविरोधी विभागाने इम्रान खान यांच्या सुरक्षेसाठी सर्व शक्य उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना दिल्या आहेत, अशी माहिती ‘जंग’ या पाकिस्तानी वृत्तपत्राने दिली आहे.
दहशतवादविरोधी विभागाने १८ जून रोजी अलर्ट जारी केला होता. धमकी गुप्त ठेवण्याचे आणि सोशल मीडियावर लीक होण्यापासून रोखण्याचे आदेशही दिले होते. तेहरीक-ए-इन्साफच्या नेत्यांनी अलीकडच्या काही दिवसांत इम्रान खान यांना असलेल्या धोक्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
माझ्याकडे अशी माहिती आहे की, अफगाणिस्तानमधील कोची नावाच्या दहशतवाद्याला इम्रान खान यांना मारण्याचा आदेश काही लोकांनी दिला आहे, असे फयाज चौहान यांनी म्हटले आहे.