मुंबई : आजपर्यंत शिवसेना फोडण्याचे प्रयत्न अनेकदा झाले. राजकारणात हार-जीत होत असते पण पक्षालाच संपवण्याचे प्रयत्न राजकारणात झाले नाही. आता शिवसेना संपवण्याचे प्रयत्न सुरु आहेत पण लक्षात घ्या की, अशी आव्हाने पायदळी तुडवत शिवसेनेने भगवा रोवलाय असा खणखणीत इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना दिला. ते एका कार्यक्रमात कार्यकर्त्यांना संबोधन करीत होते, त्यावेळी त्यांनी शाब्दीक हल्ला चढवला.
तीन लढाया सुरु
ठाकरे म्हणाले, दोन लढाया सुरु आहेत. दोन- तीन पातळीवर लढाई सुरु आहे. त्यात रस्त्यावरील एक लढाई, कोर्टात सुनावणी सुरु आहे तीही लढाईच आणि तिसरी लढाई म्हणजे निष्ठेची आहे. तुम्हाला कल्पना आहे का तिसरी लढाई कोणती? हा विषय खूप गंभीर आहे.
आम्ही भगवा रोवलाय
ठाकरे म्हणाले, न्यायदेवतेवर माझा विश्वास आहे. शिवसेना संपवण्याचे प्रयत्न होत आहेत हे मी पहिल्यांदाच बोलत होतो. परवा भाजपच्या अध्यक्षांनी सांगूनच टाकले, कि शिवसेना संपत चाललेला पक्ष आहे, पण त्यांना कल्पना नाही की, शिवसेनेने असे आव्हाने पायदळी तुडवून भगवा झेंडा रोवलेला आहे.
संपवण्याची भाषा होत आहे
ठाकरे म्हणाले, राजकारणात हारजीत होत असते. कधी कुणाचा पराभव तर विजय होतो, पण संपवण्याची भाषा केली जात नाही. दुस-यांना संपवण्याची भाषा आपल्या राजकारणात यापूर्वी झाली नव्हती.