28.2 C
Latur
Sunday, March 7, 2021
Home कोरोना उपचारांसाठी मुंबईत जम्बो सुविधांची निर्मिती

कोरोना उपचारांसाठी मुंबईत जम्बो सुविधांची निर्मिती

एकमत ऑनलाईन

मुबंई : देशात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. महाराष्टÑातही हा आकडा वाढताना दिसत आहे. प्रशासन जनतेला घाबरून जाऊ नका म्हणून संदेश देत आहे. कोरोना रुग्णाचा आकडा जसा झपाट्याने वाढत आहे तसाच रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही लक्षणीय आहे ही एक दिलासादायक गोष्ट आहे. कोरोना आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी राज्य सरकारने मुबंईत जम्बो सुविधांची निर्मिती केली आहे.

जाणून घ्या काय असतील सुविधा…..

 1. १. बीकेसी येथे एमएमआरडीने १५ दिवसांत उभारले देशातील पहिले ओपन हॉस्पिटल (१००० बेड्सची जम्बो सुविधा). याचठिकाणी २०० बेड्सची आयसीयू सुविधाही
 2. २. महालक्ष्मी येथे कोरोना केअर सेंटरचे काम सध्या युद्धपातळीवर सुरु. ६०० बेड्सची सुविधा यात १२५ बेडचे आयसीयू वॉर्ड असतील. कोविड १९ ची मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णांना येथे ठेवले जाईल.
 3. ३. नेसको गोरेगाव येथे ५३५ बेड्सची सुविधा असलेली जम्बो सुविधा कोरोना रुग्णांसाठी
 4. रेसकोर्स, दहिसर, गोरेगाव, मुलुंड येथे ७००० पेक्षा जास्त बेड्सची सुविधा असलेली डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल सेंटर आणि डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल पुढील २ आठवड्यात 
 5. ३१ मे पर्यंत एसएससीआय वरळी, महालक्ष्मी, वांद्रे व नेसको, गोरेगाव अशा मिळून २४७५ खाटा असलेल्या सुविधा रुग्ण सेवेत .
 6. प्रत्येक वॉर्डमध्ये किमान १०० खाटा आणि २० आयसीयू खाटा असलेल्या रुग्णालयांची सुविधा ताब्यात घेतली.
 7. स्वत:च्या विलगीकरणाची सोय नसलेल्या कोविड रुग्णांसाठी ३० हजार खाटा क्षमतेच्या कोव्हीड केअर सेंटरची व्यवस्था
 8. मुंबईतील खाटांचे नियोजन आता संगणकाच्या माध्यमातून होणार त्यामुळे कोणत्या ठिकाणी खाटा उपलब्ध आहेत ते लगेच कळेल. खाटांचा डाटा रिअल टाईम डॅशबोर्डमध्ये. प्रत्येक बेडला युनिक आयडी. डिस्चार्ज धोरणाची कडक अंमलबजावणी
 9. रुग्णालयांची स्वच्छता, जेवण व इतर अनुषंगिक बाबींतून डीन यांची जबाबदारी कमी केली. आरोग्य उपचारांवर अधिक लक्ष देता येणे शक्य.
 10. रुग्णवाहिका १०० वरून ४५० वर. या सेवेसाठी देखील मोबाईल ॲप
 11. केइएम, नायर, सायन, जेजे, सेंट जॉर्ज आणि बीएमसी पेरिफेरल रुग्णालये यांची जबाबदारी ५ आयएएस अधिकाऱ्यांकडे. प्रत्येक रुग्णालयात वॉर रूम, सीसीटीव्ही
 12. मनपातर्फे दररोज ७ लाख अन्नाची पाकिटे वाटप.
 13. मुंबईत ३६० फिव्हर क्लिनिक
 14. १९१६ हेल्पलाईनवर आत्तापर्यंत ६५ हजार कॉल्स.

  Read More  नियमांचे पालन करून लवकरच होणार चित्रीकरणाला सुरुवात

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,442FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या