26.9 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeपरभणीरस्ता अपघातातील ७१ जणांच्या मृत्यूस कंत्राटदार जबाबदार

रस्ता अपघातातील ७१ जणांच्या मृत्यूस कंत्राटदार जबाबदार

एकमत ऑनलाईन

परभणी : कोल्हा ते झिरोफाटा या राष्ट्रीय महामार्गाचे काम मागील ५ वर्षांपासून रखडले आहे. या महामार्गावरील ७० अपघातात ७१ मृत्यू झाले असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिली आहे. या संदर्भात आ. बाबाजानी दुर्राणी यांनी तारांकीत प्रश्न विचारला होता.

कोल्हा ते झिरोफाटा या राष्ट्रीय महामार्ग क्र Þ६१या रस्त्याचे काम मागील ५ वर्षांपासून रखडले असून २१८ अपघातात ११३ जणांच्या मृत्यूस जबाबदार असणा-या कार्यकारी अभियंता यांच्या फौजदारी गुन्हा दाखल करण्यासंदर्भात परभणी जिल्हाधिकारी यांनी मे २०२२ मध्ये आदेश काढले आहेत का? अशी माहिती आ. दुर्राणी यांनी तारांकीत प्रश्नाद्वारे विचारली. नागरिकांच्या मृत्यूस व अपघातास कारणीभूत असणारे तसेच कागदोपत्री कार्यवाही करून विहीत मुदतीत काम पूर्ण न करणारे कार्यकारी अभियंता यांच्याविरूध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे काय?, जिल्हाधिकारी यांनी आदेशीत करूनही कार्यकारी अभियंता यांच्यावर कारवाई न करता त्यांना सहकार्य करण्यात येते असल्याचे निदर्शनास येत आहे, हे खरे आहे काय अशी माहिती आ. दुर्राणी यांनी विचारली होती.

या प्रश्नाला उत्तर देताना सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी संबंधीत रस्त्याचे काम रखडल्यामुळे ७० अपघातात ७१ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. तसेच कोल्हा ते झिरोफाटा या राष्ट्रीय महामार्गाचे काम गॅनन डंकरले या कंपनीला केंद्र शासनाने दिÞ१४ एप्रिल २०१७ रोजी प्रदान केले होते. या कामाच्या कालावधीत अपघाताची संपूर्ण जिम्मेदारी कंत्राटदाराची असते. तसेच या कामाच्या निरीक्षणासाठी या कंपनीची केंद्र शासनाच्या परीवहन मंत्रालयाकडून नेमणूक करण्यात आली होती. कामाची संथ प्रगती लक्षात घेऊन दि. ९ मार्च २०२२ रोजी हे कंत्राट केंद्र शासनाने रद्द केले व उर्वरीत कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून कंत्राटदारास वर्क ऑर्डर देण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र्र चव्हाण यांनी यावेळी दिली. नवीन वर्क ऑर्डर नंतर संबंधीत रस्त्याचे काम वेगाने होईल अशी अपेक्षा नागरीकातून व्यक्त होत आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या