37.8 C
Latur
Monday, May 29, 2023
Homeमृतदेह सोबत असल्याचे प्रवास झाला सोयीस्कर

मृतदेह सोबत असल्याचे प्रवास झाला सोयीस्कर

एकमत ऑनलाईन

झांशी : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे मजुरांचे हाल सुरू असल्याचे दिसते. सरकारने ‘श्रमिक ट्रेन’ची व्यवस्था केली असली तरी अनेक मजूर आजही पायी किंवा मिळेल त्या साधनाने घरी जाण्यास मजबूर आहे. या दरम्यान अनेक मजुरांच्या डोळ्यांच्या कडा ओल्या करणाऱ्या कहाण्या समोर येत आहेत. यातील एक नाव दामोदर यांचेही आहे.

रस्त्यात एका ट्रकने दोघांना उडवले
दामोदर मूळचा झांशी येथील देवरीसिंहपुरा गावातील रहिवासी. तोआपल्या कुटुंबासह पानिपत येथे राहत होता आणि कपडा बनवणाऱ्या कारखान्यात नोकरी करायचा. लॉकडाऊन लागू झाल्यावर त्याची पत्नी त्याला गावी जाण्यासाठी जोर देत होती. दामोदर गावी आला मात पत्नीचा मृतदेह घेऊन. रस्त्यात एका ट्रकने दोघांना उडवले. यात दामोदरच्या पत्नीचा मृत्यू झाला, तर तो स्वतः जखमी झाला.

Read More  रेडझोनमधून आलेल्यांना क्वारंन्टाईन करून सुविधा द्याव्यात

पत्नीला ट्रकने लांबपर्यंत घरसटत नेले
दामोदरला 10 वर्षाची मुलगी आणि 14 वर्षाचा मुलगा आहे. नीलम आणि दीपक अशी दोघांची नावे. दामोदर सांगतो, आम्ही पानिपत येथे रहायचो आणि कपड्याच्या कारखान्यात काम करायचो. मात्र लॉकडाऊनमुळे कारखाना बंद झाला. पत्नीच्या बहिणीला मुलगी झाल्याने आम्ही गावी जाण्याचे ठरवले. 17 मे रोजी काय निर्णय होतो हे पाहू, नाही तर पायीच गावी निघू, असे पत्नी म्हणाली. लॉकडाऊन वाढल्याने आम्ही दोघे पायीच गावी निघालो. मात्र 25 किलोमीटर चालल्यावर अचानक एक ट्रक मागून आला आणि आम्हाला उडवले. पत्नीला ट्रकने लांबपर्यंत घरसटत नेले. यातच तिचा मृत्यू झाला. पायी निघालेलो आम्ही रुग्णवाहिकेत गावी आलो. माझ्यासोबत मृतदेह असल्याने मी सहज गावी पोहोचलो, पण आता परत जाऊ शकणार नाही, असे भरल्या डोळ्याने दामोदर यांनी सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या