नवी दिल्ली : भारतात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. रविवार, २६ जूनपर्यंत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, भारतात ११,७३९ नवीन कोविड -१९ प्रकरणे नोंदली गेली आहेत.
मंत्रालयाने सांगितले की, गेल्या २४ तासांत २५ जणांचा मृत्यू झाला. तर, गेल्या २४ तासांत कोविड-१९ मधून १०,९१७ लोक बरे झाले आहेत. दरम्यान, शनिवारी कोरोनाचे १५,९४० रुग्ण आढळले होते. भारतात सक्रिय रुग्णांची संख्या ९२ हजारांच्या पुढे गेलीय.
आज कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या ९२,५७६ आहे. आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, एकूण संसर्गांपैकी ०.२१ टक्के सक्रिय प्रकरणे आहेत, तर देशातील कोरोना बरे होण्याचे प्रमाण ९८.५८ टक्क्यांपेक्षा जास्त आहे.