24.4 C
Latur
Monday, September 20, 2021
Homeराष्ट्रीयकोरोनाचा डोळ्यांसह डोकेदुखीची समस्या वाढली

कोरोनाचा डोळ्यांसह डोकेदुखीची समस्या वाढली

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे जेवढे फुफ्फुसांना नुकसान होत आहे, तेवढाच परिणाम शरीराच्या इतर भागांवरही दिसून येत आहे. कोरोनातून बरे झालेल्या रूग्णांमध्ये अस्पष्ट दिसणे किंवा डोकेदुखीच्या तक्रारींमध्ये वाढ होत आहे. कोरोना रूग्णांसह, बरेच दिवस घरात बसून काम करणा-या लोकांच्या डोळ्यांची समस्याही वाढत आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, डोळयाच्या रूग्णांची संख्या मागील वर्षाच्या तुलनेत दुपटीने वाढली आहे. सर गंगा राम रुग्णालयातील नेत्ररोग विभागाचे प्रमुख डॉ. एके ग्रोव्हर यांच्या म्हणण्यानुसार, मुलांमध्ये डोळयांची समस्या वाढत आहे.

डॉ. ग्रोव्हर यांच्या म्हणण्यानुसार, कोरोनातून पूर्णपणे बरे झालेल्या लोकांमध्ये डोकेदुखीच्या तक्रारी दिसून येत आहेत. अशा रुग्णांच्या तपासणीनंतर त्यांना न्यूरो आणि नेत्ररोग तज्ज्ञांकडे पाठविले जात आहे. आम्हाला माहिती मिळाली आहे की, डोळे कमकुवत झाल्यामुळे रुग्णांना डोकेदुखीचा त्रास होत आहे. कारण कोरोनाचा परिणाम शरीराच्या प्रत्येक भागावर होतो, म्हणून डोळेही पूर्वीच्या तुलनेत वेगाने कमकुवत होत आहेत. तसेच, ज्या रुग्णांनी कोरोना दरम्यान अधिक स्टिरॉइड्सचा वापर केला आहे, त्यांच्याही डोळयावर वाईट परिणाम झाला आहे.

कोरोना रूग्णांव्यतिरिक्त, जे लोक निरोगी रूग्ण आहेत. त्यांना आपले जास्तकरून काम लॉकडाऊन दरम्यान घरातूनच करावे लागत आहे. बरीच कार्यालये अद्याप बंद आहेत, ज्यामुळे लोक ब-याच तासांपासून लॅपटॉपवर सतत काम करत असतात. मुलांचे वर्गही गेल्या एक वर्षापासून ऑनलाईन सुरू आहेत. या सर्वांचा परिणाम डोळयांवरही दिसून येतो. डॉ. ग्रोव्हर म्हणाले की, सध्या कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम देखील दिसून येत आहे. लॅपटॉप व मोबाईल स्क्रीनमधून निघणा-या किरणांमुळे डोळयांचेही बरेच नुकसान होते.

मुलांमध्ये डोळयांची समस्या अधिक
राजधानी दिल्लीतील रूग्णालयात, ओपीडीच्या नेत्ररोग विभागात उपचारांसाठी आलेल्यांपैकी ६० टक्के मुले आहेत. जीटीबी रुग्णालयाचे डॉ. विजय प्रताप यांनी सांगितले की, गेल्या एक वर्षापेक्षा अधिक दिवसांपासून मुले शाळेत जात नाहीत. ऑनलाईन अभ्यास करत आहेत. र्ब­याच घरांमध्ये मुलांना फोनद्वारे शिकवले जात आहे. या कारणास्तव पूर्वीपेक्षा डोळ्यांवर अधिक जोर दिला जात आहे. अशा परिस्थितीत पालकांनी मुलांवर लक्ष ठेवले पाहिजे आणि त्यांना कोणत्याही प्रकारची समस्या आढळल्यास तत्काळ डॉक्टरांकडे घेऊन गेले पाहिजे.

राज्यात लसीकरणाचा नवा विक्रम

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या