Saturday, September 23, 2023

हवेतूनही होतोय करोना संसर्ग; ३२ देशांच्या शास्त्रज्ञांनी दिला इशारा

हवेच्या माध्यमातून करोना विषाणूचा प्रसार होत असल्याची भीती शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. करोना विषाणूचे छोटे छोटे कण हवेतही जिवंत राहतात आणि त्यामुळे लोकांमध्ये त्याचा संसर्ग होऊ शकतो, असे ३२ देशांच्या २३९ शास्त्रज्ञांच्या संशोधनात समोर आले आहे. जागतिक आरोग्य संघटनाने (WHO) करोना व्हायरसचा प्रादुर्भाव कसा होतो यासंदर्भातील माहिती जारी केली होती. त्यानुसार हा विषाणू हवेतून पसरत नाही असा दावा करण्यात आला होता.

न्यूयॉर्क टाइम्स मध्ये छापलेल्या एका रिपोर्ट्सनुसार, ह्यशास्त्रज्ञांनी जागतिक आरोग्य संघटनेला याबाबत एक सविस्तर पत्र लिहलं आहे. करोना विषाणूचा प्रसार हवेतून होत आहे. त्याचे सर्व पुरावेही आहेत. त्यानुसार करोनाच्या विषाणूचे छोटे-छोटे कण हवेत तरंगतात. ते लोकांमध्ये करोनाचा संसर्ग होण्यास पुरेशे आहेत. त्यामुळे यावर पुन्हा एकदा संशोधन करण्याची विनंती आहे.ह्ण हे पत्र सायन्टिफिक जर्नलमध्ये पुढील आठवड्यात प्रकाशित होणार आहे. २०१९ वर्षाअखेरीस चीनमधील वुहान येथे करोना व्हायरस आढळून आला होता. यानंतर आता जवळपास सर्वंच जगभरातील देशांमध्ये करोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत आहे.

हवेच्या माध्यमातून करोना विषाणूचा प्रसार होत असल्याच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या या दाव्यावर न्यूज एजेन्सी रॉयटरने जागतिक आरोग्य संघटनेकडे प्रतिक्रिया मागवली आहे. पण यावर WHO कडून कोणतेही उत्तर आलेलं नाही.

Read More  करोनाची लागण झाल्याच्या भीतीने तरुणाने तलावात उडी घेऊन संपवले जीवन

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या