निलंगा : निलंगा तालुक्यातील कोराळी येथील कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेले तालुक्यातील आणखी २ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण निघाल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ३ दिवसांपूर्वी कोराळी येथे कोरोनाचे
६ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले होते.
निलंग्यात या पूर्वी एप्रिलमध्ये उत्तर भारतातून दक्षिण भारतात जाणारे ८ प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने शहरासह तालुक्यात भयभीत वातावरण निर्माण झाले होते मात्र प्रशासनाने खूप काळजी घेतली व ते रुग्ण व्यवस्थित झाले. आता नव्याने ग्रामीण भागात पुणे, मुंबई येथून लोक मोठ्या प्रमाणात येत असल्याने ग्रामीण भागातील चिंता वाढलेली आहे. त्यातच मुंबई येथून निलंगा तालुक्यातील कोराळी येथे आलेले ६ जण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण निघाल्याने नागरिकांची धाकधूक वाढलेली आहे शिवाय कोराळी येथील कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेले लांबोटा व कोराळी येथील प्रत्येकी एक असे दोन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल लातूर येथील विलासराव देशमुख वैद्यकीय विज्ञान संस्थेतून प्राप्त झाला असल्याचे उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी सांगितले. यामुळे निलंगा तालुक्यातील वातावरण पुन्हा भयभीत झाले आहे.
Read More चीनच्या बैठकांमध्ये आता शाकाहारी भोजन
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लांबोटा सील
लांबोटा येथील ४ जण कोराळी येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसोबत मुंबई येथून लांबोटा येथे आले होते. त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलेले आहे़ त्यातील एक जण कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने अत्यावश्यक सेवा वगळता लांबोटा १४ दिवसांकरिता सील करण्यात आले असल्याचे उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी सांगितले़