Tuesday, October 3, 2023

48 तासांत 288 पोलिसांना कोरोनाची बाधा

आतापर्यंत 478 पोलिसांनी कोरोनावर मात : 1666 पोलिस जवानांना कोरोनाची बाधा; 16 पोलिस जवानांचा कोरोनामुळे मृत्यू

मुंबई | राज्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असताना कोरोनाच्या संकटात आपला जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या महाराष्ट्र पोलिस दलातील जवानांना कोरोनाची लागण होण्याचं प्रमाण वाढलं आहे. गेल्या 24 तासांत 288 पोलिसांना कोरोनाची लागण झाली असल्याचं समोर आलं आहे.

Read More  सोलापूरात 28 नवे कोरोनाबाधित रुग्ण : दिवसभरात 6 जणांचा मृत्यू

आतापर्यंत महाराष्ट्र पोलिस दलातील 1666 पोलिस जवानांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर दुर्दैवाची गोष्ट म्हणजे 16 पोलिस जवानांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

दुसरीकडे राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत चालला असला तरी रूग्णांचं बरं होण्याचं प्रमाण देखील वाढलं आहे. तसंच पोलिस दलातील रूग्णांचं बरं होण्याचं प्रमाण देखईल खूप चांगलं आहे. आतापर्यंत 478 पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे. यामध्ये 35 पोलीस अधिकारी आणि 438 पोलिस कर्मचारी कोरोनामुक्त झाले आहेत.

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या