23.8 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeराष्ट्रीयकोरोनानंतर आता ‘शिगेला’चे थैमान; तब्बल ५८ रुग्ण, एकाचा मृत्यू

कोरोनानंतर आता ‘शिगेला’चे थैमान; तब्बल ५८ रुग्ण, एकाचा मृत्यू

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देश सध्या कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहे. याच दरम्यान धडकी भरवणारी माहिती समोर येत आहे. कोरोनाचा कहर सुरू असतानाच आता आणखी एका बॅक्टेरियाने थैमान घातले आहे. यामुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे.
देशात शिगेला बॅक्टेरियाची प्रकरणं समोर आली आहेत. ५८ जण आजारी पडले आहेत. तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. शिगेला बॅक्टेरियाचे रुग्ण सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
केरळच्या कासरगोडमध्ये फूड पॉयझनिंगमागे शिगेला बॅक्टेरिया असल्याचे म्हटले जात आहे. एका हॉटेलमध्ये जेवण केल्यानंतर तब्बल ५८ लोक आजारी पडले तर एका मुलीचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील एका वरिष्ठ आरोग्य अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, अन्नपदार्थांतून विषबाधा होण्याचे कारण शिगेला बॅक्टेरिया असल्याचे सांगितले जात आहे. कोझिकोड मेडिकल कॉलेज रुग्णालयात फूड पॉयझनिंग झालेल्या रुग्णांच्या रक्ताच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली.

सर्व रुग्णांपैकी पाच रुग्णांचे नमुने पाठवण्यात आले होते, त्यापैकी तीन रिपोर्टमध्ये शिगेला बॅक्टेरियाचे संक्रमण असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे याला बॅक्टेरियाचा उद्रेक मानले जात आहे. बॅक्टेरियाचा प्रसार रोखण्यासाठी आवश्यक ती पावलं उचलली जात आहेत. जिल्हा प्रशासन आणि आरोग्य अधिकारी सामान्य नागरिक आणि अन्नपदार्थ विक्रेत्यांना याबाबत जागरूक करत आहेत. या आजारापासून कसा बचाव करता येईल याचे उपाय सांगितले जात आहेत.

दूषित अन्न-पाण्यामार्फत हे बॅक्टेरिया पसरतात. त्यामुळे अन्नपदार्थ, पाणी स्वच्छ असणे गरजेचे आहे. आरोग्य अधिका-यांमार्फत विविध हॉटेल्स आणि रेस्टॉरंटमधील अन्नपदार्थांची आणि पाण्याचीही तपासणी केली जात आहे. शिगेला बॅक्टेरिया असलेल्या लोकांमध्ये अतिसार, ताप आणि ओटीपोटात दुखणे ही लक्षणे आढळून येतात. शिगेलाच्या रुग्णांमध्येही १ ते २ दिवसांनी लक्षणे दिसू लागतात. शिगेलाचे सौम्य रुग्ण उपचाराशिवाय बरे होऊ शकतात. परंतु गंभीर प्रकरणे धोकादायक आणि प्राणघातक देखील असू शकतात.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या