22.4 C
Latur
Saturday, June 19, 2021
Homeमहाराष्ट्र१५ दिवसांत जाधव कुटुंबियांना कोरोनाने संपवले; पुणेकरांनो, सावध व्हा!

१५ दिवसांत जाधव कुटुंबियांना कोरोनाने संपवले; पुणेकरांनो, सावध व्हा!

एकमत ऑनलाईन

पुणे : अगदी दोन महिन्यांपूर्वी घरातील प्रत्येक जण गुण्यागोविंदाने राहत होता. पण एका बेसावध क्षणी घरात कोरोनाचा शिरकाव झाला, अन् काही समाजायच्या आत अवघ्या १५ दिवसांत एक संपूर्ण कुटुंब संपवलं. ही अतिशय दुर्दैवी तितकीच हृदयद्रावक घटना घडली आहे पुण्यातील जाधव कुटुंबियांच्या बाबतीत़ अगदी काही महिन्यांपूर्वी अख्खं कुटुंब एकत्र असलेल्या या कुटुंबियांच्या फक्त आठवणीच आता मागे उरल्यात. ही कहाणी आहे पुण्यातल्या येरवडा परिसरात राहणा-या जाधव कुटुंबाची. या कुटुंबातले ४ जण पंधरा दिवसांमध्ये मृत्युमुखी पडलेत. त्यांच्या मृत्यूचं कारण अर्थातच कोरोना आहे.

१५ जानेवारीला जाधव कुटुंबाचे प्रमुख शंकर जाधव यांना हृदयविकाराचा झटका आला अन् त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर साधारण फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात एका पूजेनिमित्त हे सगळं कुटुंब एकत्र आलं अन् कोरोनाला निमंत्रण मिळालं.

संपूर्ण कुटुंबच विळख्यात
या पूजेनंतरच कुटुंबातील एकानंतर एक जण पॉझिटिव्ह यायला सुरुवात झाली. सर्वात आधी जाधव यांची विवाहित मुलगी कोरोना पॉझिटिव्ह आली. त्यानंतर पॉझिटिव्ह आला तो ३८ वर्षांचा धाकटा मुलगा रोहित जाधव. त्या पाठोपाठ एक एक करत इतर सगळेच पॉझिटिव्ह आले. शहरातील परिस्थिती अगदी बिकट असताना पॉझिटिव्ह झालेल्या या सगळ्यांना अ‍ॅडमिट करायची वेळ आली़

बेडसाठी वणवण
दुसरा भाऊ ४० वर्षांचा अतुल कोथरूडच्या देवयानी रुग्णालयात. वैशालीची आई अलका जाधव विश्रांतवाडीच्या रुग्णालयात दाखल होत्या. २८ मार्चला वैशालीची ऑक्सिजन पातळी कमी होती. त्यांना आधी भारती हॉस्पिटलला नेले. तिकडे बेड मिळाला नाही म्हणून रुबीला नेले़ प्रकृती सुधारतेय असे वाटत असतानाच दुर्दैवाने ३० मार्चला त्यांचा मृत्यू झाला.

एसटी कर्मचा-यांच्या लसीकरणासाठी प्रयत्न – अनिल परब

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
203FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या