ठाणे, 30 जुलै : कोरोनाच्या संकटात खाकी वर्दीतील कोरोना योद्धे आपल्या जीवाची पर्वा न करता काम करत आहे. मात्र कर्तव्य बजावत असताना अनेक जण या महामारीमुळे शहीद झाले. पोलीस दलातील दोन जुळे भाऊ कोरोनाच्या लढ्यात शहीद झाल्याची घटना समोर आली आहे.
दिलीप घोडके आणि जयसिंग घोडके अशी पोलीस असलेल्या या जुळ्या भावांची नावं. दिलीप आणि जयसिंग हे दोघेही एकाच दिवशी पोलीस दलात भरती झाले होते. यापैकी दिलीप हे उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात, तर जयसिंग हे अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात हवालदार पदावर कार्यरत होते.
8 दिवसांपूर्वीच म्हणजेच 20 जुलै रोजी दिलीप घोडके यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यानंतर 28 जुलै रोजी जयसिंग यांचाही कोरोनामुळेच मृत्यू झाला. अवघ्या 8 दिवसांच्या फरकाने या दोघांचाही कोरोनाने बळी घेतला. त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दोघांच्या मृत्यूमुळे अंबरनाथ पोलीस ठाणे आणि हिललाईन पोलीस ठाण्यातील त्यांच्या सहकार्यांमध्ये मोठी शोककळा पसरली आहे.
Read More लातूर जिल्ह्यात १ ते १५ ऑगस्टदरम्यान लॉकडाऊन असणार पण त्याचे स्वरुप आज ठरणार