Tuesday, September 26, 2023

कोरोना, चक्रीवादळानंतर आता टोळधाडींचे संकट

भोपाळ: वृत्तसंस्था
देशामधील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असतानाच पूर्वेकडील पश्चिम बंगाल आणि ओडिशा राज्यांना अम्फान चक्रीवादळाचा फटका बसला आहे. अशातच महाराष्ट्राच्या शेजारील मध्यप्रदेश राज्यालाही एका नैसर्गिक संकटाला तोंड द्यावे लागत आहे. बुधवारी संध्याकाळी मध्य प्रदेशच्या पश्चिमेकडील १५ जिल्ह्यांमधील अनेक गावांवर टोळधाड पडली. मध्यप्रदेशमधील पानबिहार जिल्ह्यातील राणा हेडा गावातील झाडांवर हजारोंच्या संख्येने टोळ दिसून आले. एवढ्या मोठ्या प्रमाणात टोळधाड पडल्याने भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी राजस्थानमध्ये पडलेल्या टोळधाडींच्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या. या टोळीधाडीसंदर्भातील वृत्त आयएएनएस वृत्तसंस्थेने दिले आहे.

पानबिहारमधील अनेक गावांमध्ये हजारोंच्या संख्येने टोळ दिसून आले. येथील रणहेरा गावात टोळांची संख्या इतकी होती की सरकारी यंत्रणांनी येथे औषध फवारणी केली. या टोळांवर नियंत्रण मिळवण्यासाठी १२ स्वेअर किलोमीटरच्या परिसरात औषधांची फवारणी करण्यात आल्याची माहिती कृषी विभागाच्या उपसंचालिका नीलम सिंह यांनी दिली. हे टोळ राजस्थानमधून मध्यप्रदेशमध्ये आल्याचे कृषी विभागाच्या अधिका-यांचे म्हणणे आहे. मध्यप्रदेशमधील उज्जैन, मंदसौर, नीमच, अगर-मालवा आणि इतर जिल्ह्यांमधील शेतकºयांना या टोळधाडींचा फटका बसला आहे. पानबिहारबरोबरच नीमचच्या बाजूने पडलेल्या टोळधाडींमुळे हनुमंतिया, गुर्जर खेडी, खोर, नयागाव, केशरपुरा, कनका, सगराना या ठिकाणी शेतमालाचे मोठे नुकसान झाले आहे.

Read More  आजारी वडिलांसह सायकलवरून १,२०० किमी प्रवास!

याआधी टोळधाड कधीही न पाहिलेल्या शेतकºयांमध्ये या हल्ल्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे़ बुधवारी सकाळी शेतांवर मोठ्या संख्येने टोळधाडी पडताना पाहून सुरुवातील शेतकरी गोंधळले. त्यानंतर टोळांना पळवून लावण्यासाठी आणि पिके वाचवण्यासाठी शेतकºयांनी वेगवेगळ्या गोष्टी वाजवून आवाज करण्यास सुरुवात केली. काहींनी मशाली पेटवून शेतामध्ये धाव घेत पिके वाचवण्याचा प्रयत्न केला. राजस्थानला लागून असलेल्या मध्यप्रदेशच्या सीमा भागामध्ये टोळांचे नऊ मोठे गट सक्रीय झाल्यची माहिती कृषी विभागाने दिली आहे.

जिरण तहसीलमधील बरखेडा गुर्जर, अर्निया बोराणा, सकराणी जागीर, धौकखेडा, कुचाडौड या गावांमध्येही टोळांनी मोठ्या संख्येने शेतमालाची नासधूस केली. मल्हागडमधून या टोळांनी मध्यप्रदेशमध्ये शिरण्यास सुरुवात केली. पाहता पाहता काही तासांमध्ये भाऊसाखेडा, निनोरा, खोखरा, अमरपुरा गावांमध्ये हे टोळ पोहोचले. येथील शेतकरÞ्यांनी ढोल, डीजे वाजवून या टोळांना पळवून लावण्याचा प्रयत्न केला. नंतर या टोळांनी सोनी, खोख्रा, निनोरा, चांदवासा अशा अनेक गावामध्ये नुकसान केले. बुधवारी रात्री हे टोळ मुल्तानपुरा, गुरडिया देडा येथील शेतांमध्ये दिसून आले.

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या