Tuesday, September 26, 2023

भारतात कोरोनाचा उद्रेक,  २४ तासांत आढळले ५२४२ रुग्ण

​भारतात कोरोनाचा उद्रेक चालूच असून गेल्या २४ तासांता देशात ५२४२ कोरोना रुग्ण आढळले असून ही आतापर्यंतची सर्वाधिक वाढ झालेली रुग्णसंख्या आहे. यामुळे देशात कोरोना रुग्णांची एकूण संख्या ९६१६९ वर पोहोचली आहे. गेल्या २४ तासांत १५७ रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांची एकूण संख्या ३०२९ इतकी झाली आहे अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

Read More  युरोपीयन राष्ट्रांमध्ये लॉकडाऊन शिथिल

देशात सद्य स्थितीत ५९३१६ रुग्णांवर उपचार सुरु असून ३६८२४ रुग्ण बरे झाल्याची माहिती देखील आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

भारतात सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात असून राज्यात एकूण ३३०५३ रुग्ण आढळले आहेत. त्यापाठोपाठ गुजरातमध्ये ११३७९ एकूण रुग्ण आहेत. गुजरात नंतर तमिळनाडू आणि नवी दिल्लीत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत.

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या