नांदेड : प्रतिनिधी
मागील दोन दिवसापासून पाठविण्यात आलेले कोरोना संसर्ग संशयितांचे ३०४ नमुना तपासणी अहवाल प्रलंबित होते़यामुळे अनेकांच्या मनात भिती निर्माण झाली होती़ ही अखेर खरी ठरली असून शनिवार हा कोरोना वार ठरला आहे़ सकाळपर्यंत प्राप्त झालेल्या ४१ अहवाला पैैकी १८ रूग्ण पॉझिटिव्ह आले आहेत़यामुळे नांदेडची रूग्ण संख्या ८४ वर पोहचली आहे़या नव्या बाधितांमध्ये १५ तरुण, उर्वरित तिन महिलांचा समावेश आहे़दरम्यान सायंकाळपर्यंत तब्बल ३८० स्वॅबचे अहवाल अजूनही प्रलंबित होेते.
गेल्या काही दिवसापासून नांदेडमधील कोरोनाच्या रूग्णांची संख्या वाढत आहे़ दि़१३ मे रोजी सायंकाळ पर्यंत प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आलेल्या स्वॅबपैकी केवळ तीन जण पॉझिटिव्ह आले होेते़यामुळे रूग्णांची ६६ झाली होती़यानंतर कोरोना विषाणु संदर्भात दि़१४ व १५ मे रोजी पाठविण्यात आलेल्या ३०४ जणांचे अहवाल प्रलंबित होते़यामुळे प्रशासनासह नागरिकांत भिती वाढली होती़ ती अखेर खरी ठरली़या स्वॅब पैकी ४१ रुग्णांचा अहवाल रात्री उशिरा प्राप्त झाला आहे. त्यामध्ये नवीन १८ रुग्ण हे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८४ वर पोहचली आहे.त्यामुळे नांदेड पुन्हा हादरले आहे़तर अजूनही ३८० स्वॅबचे नमुन्याचा अहवाल तांत्रिक अडचणीमुळे प्रलंबित आहे़यामुळे रूग्ण संख्या वाढते की काय याची धास्ती वाढली आहे.
Read More अफवांना बळी पडू नका, प्रशासन परिस्थिती हाताळण्यासाठी सुसज्ज
शनिवारी नवीन १८ पॉझिटिव्ह रुग्णांपैकी १३ रुग्ण प्रवासी असून ४ रुग्ण करबला भागातील तर एक रुग्ण कुंभारगल्ली सराफा भागातील आहे. सदर रूग्णांत १५ पुरूष असून पंधरा ते २७ या वयोगटातील आहेत़ तर तीन महिला या ५० ते ५२ या वयोगटातील आहेत़ या सर्व रुग्णांवर यात्री निवास एनआरआय भवन व शासकीय आयुर्वेद महाविद्यालय नांदेड येथे औषधोपचार सुरु आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्या संपकार्तील व्यक्तींचा शोध घेणे चालू आहे.
नांदेड जिल्ह्यात ८४ पॉझिटिव्ह रुग्णांपैकी २६ रुग्ण हे बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. उपचार सुरु असलेल्या ५१ रुग्णांपैकी ८ रुग्ण हे डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय नांदेड, तसेच पंजाब भवन कोवीड केअर सेंटर व यात्री निवास कोवीड केअर सेंटर येथे ४१ रुग्ण व बारड ग्रामीण रुग्णालय येथील धर्मशाळेत कोवीड केअर सेंटरमध्ये- एक रुग्ण तसेच शासकीय आयुर्वेद महाविद्यालय नांदेड येथे- एका रुग्णावर औषधापचार सुरु आहेत. औषधोपचारास प्रतिसाद न दिल्यामुळे एकुण पॉझिटिव्ह ५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
जनतेनी अफवांवर विश्वास न ठेवता मनात कुठल्याही प्रकारची भिती बाळगू नये व अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि नांदेड जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे. तसेच आपल्या मोबाईलमध्ये आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करुन घ्यावा, जेणेकरुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास या अॅपद्वारे सतर्क राहण्यास मदत मिळेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.
कुंभारटेकडी परिसर सील

कुंभार टेकडी याठिकाणी आज सापडलेला कोरोनाबाधित रुग्ण हा २५ वषार्चा तरुण असल्याचे सांगण्यात येते.या तरुणाला दोन तीन दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.त्याचा स्वॅब घेतला असता तो पॉझिटिव्ह आढळून आला. या संसगार्चा प्रसार रोखण्यासाठी कुंभारटेकडी परिसराला सील करण्यात आले आहे.यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपुल इटनकर, मनपा आयुक्त सुनील लहाने, अतिरिक्त पोलिस अधीक्षक दत्ताराम राठोड, उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील, मनपाचे उपायुक्त संधू आदींची या वेळी उपस्थिती होती.
१३ प्रवासी,४ करबला व १ रुग्ण कुंभारगल्ली नव्या पॉझिटिव्ह रुग्णांपैकी १३ रुग्ण प्रवासी असून ४ रुग्ण करबला भागातील तर एक रुग्ण कुंभारगल्ली सराफा भागातील आहे. सदर रूग्णांत १५ पुरूष असून पंधरा ते २७ या वयोगटातील आहेत़ तर तीन महिला या ५० ते ५२ या वयोगटातील आहेत़ सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्या संपकार्तील व्यक्तींचा शोध घेण्याचे काम आरोग्य विभाग व मनपाने सुरू केले आहे.