मुंबई: दिवाळीच्या काळात फटाक्यांच्या धुरामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपण आतापर्यंत केलेली सगळी मेहनत वाया जाईल. त्यामुळे फटाक्यांवर बंदी घालण्याऐवजी नागरिकांनी स्वत:वरच काही बंधने घालून घ्यावीत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. पूर्वीच्या काळात फटाके वाजवण्यात गंमत होती. मात्र, अलीकडच्या काळात लोकसंख्या आणि प्रदूषण वाढले आहे. फटाक्यांच्या धुरामुळे प्रदूषण होऊन कोरोनाचा धोका वाढत असेल तर आपण फटाक्यांवर बंदीऐवजी स्वत:वर काही बंधने घालून घेऊ शकत नाही का, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना विचारला.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज जनतेशी संवाद साधणार असल्याने ते काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मला तुमच्यावर आणीबाणी लादायची नाही. राज्य सरकार फटाक्यांवर बंदीही घालू शकते. मात्र, बंदी आणि कायदे करुनच जीवन सुरु ठेवायचे का, याचा निर्णय नागरिकांनीच घ्यावा, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. नागरिकांनी दिवाळीचा आनंद साजरा करण्यासाठी आपल्या घराच्या आजुबाजूला फटाके जरुर वाजवावेत. मात्र, सार्वजनिक ठिकाणी अजिबात फटाके वाजवू नयेत, असे उद्धव ठाकरे यांनी निक्षून सांगितले.
आयुष्यभर ब्रम्हचारी माधव पाटलांनी वयाच्या ६६ वर्षी का थाटला संसार